जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवादी ठार Sakal
देश

आणखी तीन दहशतवाद्यांचा काश्‍मीरमध्ये खातमा

२४ तासांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची एकूण संख्या आता सातवर पोचली आहे

विकास खिलारी

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दोन स्वतंत्र चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. त्यामुळे, गेल्या २४ तासांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची एकूण संख्या आता सातवर पोचली आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात रविवारी (ता. १९) रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत सोमवारी आणखी दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. त्याआधी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यामुळे, चा चकमकीत मृत्युमुखी पडणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या चारवर गेली.

पोलिसांनी ट्विटरवरून चकमकीबद्दल माहिती दिली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर स्फोटके व शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबारास सुरूवात केली. त्यानंतर, प्रत्युत्तरादाखल दलाने दहशतवाद्यांवर गोळीबार केला. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला. पुलवामातील चाटपोरा परिसरात दहशतवादी असल्याची खबर दलाला मिळाली होती.

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एकूण सात दहशतवादी मारले गेले. यापैकी तीन दहशतवादी पाकिस्तानी असून चार दहशतवादी स्थानिक आहेत. कुपवाडा आणि पुलवामातील चकमक संपली असून कुलगाममध्ये अद्याप चकमक सुरू आहे.

- विजयकुमार, पोलिस महानिरीक्षक, काश्मीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT