Three terrorists killed cop injured in Jammu encounter case 
देश

काश्मीरमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था

श्रीनगर : श्रीनगरच्या नारबल चौकाजवळ लावापोरा भागातील तपासणी नाक्‍यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, तर सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला. दरम्यान, काश्‍मीर खोऱ्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढण्याच्या निर्णयास सहा महिने पूर्ण झाले. या पार्श्‍वभूमीवर खोऱ्यात बहुतांश भागात शुकशुकाट होता.

आज सकाळी लावापोराच्या नाक्‍यावर तपासणी सुरू होती. या वेळी तीन दहशतवादी स्कूटरवरून जात होते. नाक्‍यावरच्या सुरक्षा दलांवर त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या वेळी सीआरपीएफच्या जवानाच्या डोक्‍याला गोळी लागली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान सुरक्षा दलाने तिघांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.यात दोन दहशतवादी जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. यावेळी गाडीतून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

मुख्यमंत्र्यांना वाटते आपण शेतकऱ्यांचे तारणहार : राजू शेट्टी

तत्पूर्वी, काश्‍मीर खोऱ्यात कलम 370 हटविण्याच्या निर्णयास आज सहा महिने पूर्ण झाले, त्यामुळे कालपासून काश्‍मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले जात असल्याने बहुतांश भागांत दुकाने बंदच राहिली. या पार्श्‍वभूमीवर प्रदेशात बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढल्यानंतर राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले, तसेच नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली. कालांतराने काश्‍मीर खोऱ्यातून निर्बंध काढले जाऊ लागले. बहुतांश भागांत इंटरनेट सेवा सुरू असली तरी दहशतवाद्यांच्या धास्तीने दुकानदार दुकाने सुरू करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात सकाळच्या वेळी दुकाने सुरू होतात, मात्र दुपारनंतर बंद राहतात. सौरा भागात आज एका ठिकाणी पोस्टरबाजी करून दुकाने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते. दुकान सुरू ठेवल्यास नुकसानीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी प्रक्षोभक पोस्टर जमा केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT