Tiger Claw Row 
देश

Tiger Claw Row: मशिदी अन् दर्ग्यांमध्ये मोराची पिसे, तिथेही छापे टाका; भाजप आमदाराची मागणी

Sandip Kapde

Tiger Claw Row: कर्नाटक भाजप नेते आणि आमदार अरविंद बेलाड यांनी धार्मिक कारणांसाठी मोराच्या पिसांचा वापर होत असल्याच्या कारणावरून सर्व मशिदी आणि दर्ग्यांवर छापे टाकण्याची मागणी केली आहे. वनविभागाने नोटीस बजावून भाजपचे राज्यसभा खासदार आणि अभिनेते जगेश यांच्या घराची झडती घेतल्यानंतर बेलाड यांनी ही मागणी केली. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान जगेश यांनी वाघाच्या पंजाचे पेंडेंट घातले होते. त्यामुळे त्यांच्या घराची झडती घेण्यात आली.

यामुळे आमदार अरविंद बेलाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली. तसेच मशिदी आणि दर्ग्यांची चौकशी करण्याची मागणी केली. "वाघांची नखे ऐतिहासिकदृष्ट्या चांगल्या वातावरण निर्मितीसाठी वापरले जातात.  मला सिद्धरामय्या यांना विचारायचे आहे की, राज्यसभा खासदार जगेश यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जाऊ शकते तर दर्गे आणि मशिदींमध्ये मोराच्या नखांचा वापर होत असताना तुम्ही शांत का?"

"सिद्धरामय्या जाऊन त्या मोराच्या पिसांचं आशीर्वाद घेतात. त्यांना दिसत नाही का? मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तो गुन्हा आणि कायद्याच्या विरोधात आहे," असे बेलाड म्हणाले.

वाघाच्या नंखांवरुन वाद सुरू झाला जेव्हा कन्नड बिग बॉस स्पर्धक वरथूर संतोषला वाघाच्या नखांचे लॉकेट ठेवल्याबद्दल शोच्या सेटवरून अटक करण्यात आली होती. वाघाची नखे बाळगणे कायद्याच्या विरोधात आहे. त्याची विक्री किंवा खरेदी देखील कायद्याच्या विरोधात आहे. (Latest Marathi News)

वन विभागाचे अधिकारी 22 ऑक्टोबर रोजी शोच्या सेटवर पोहोचले आणि वाघाच्या नखांच्या लॉकेटची तपासणी केली. तपासणी केल्यावर वाघाचे नखे खरा असल्याचा निष्कर्ष निघाला आणि वरथूर संतोषला अटक करण्यात आली. (Karnataka Latest News)

दरम्यान, अभिनेते आणि भाजप खासदार जगेश यांनी वन अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर कर्नाटक उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत त्यांच्या जागेची झडती घेतल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वाघ, सिंह, हरीण यांसारख्या वन्य प्राण्यांना मारणे आणि त्यांचे पंजे, कातडी, शिंगे इत्यादी ठेवणे किंवा विकणे हा गुन्हा मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT