New Parliament Inauguration Esakal
देश

New Parliament Inauguration: नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; दिल्लीच्या सर्व सीमा केल्या सील

पोलीस तसेच निमलष्करी दलाचे जवानही त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. संसद भवनाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक पोलिसांकडून सर्वसामान्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि पॅरा मिलिटरीही तैनात करण्यात आले असून, यावेळी महिला पोलिसांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, आज (28 मे रोजी) संसदेजवळ महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. (Latest Marathi News)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत निमलष्करी दलाच्या 20पेक्षा जास्त तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये10 पेक्षा जास्त महिलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संसदेजवळील मेट्रो स्टेशनही बंद राहणार आहेत. 28 मे रोजी नवीन संसदेच्या उद्घाटनावेळी दोन मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यासाठी दिल्ली मेट्रोला आधीच पत्र देण्यात आलं होतं.

या कार्यक्रमानिमित्त सिंघू बॉर्डर, दिलशाद गार्डन बॉर्डर, बदरपूर बॉर्डर आणि टिकरी बॉर्डर येथे बॅरिकेडिंग करण्यात येणार असून पोलीस तसेच निमलष्करी दलाचे जवानही त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT