देश

Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूवरुन 'अमूल'चं स्पष्टीकरण; म्हणाले, आमचा पुरवठा...

Amul Dairy company: सोशल मीडियामध्ये अमूलच्या नावाने काही पोस्ट करण्यात येत आहेत. यामध्ये अमूलकडून तिरुमला देवस्थानला तुपाचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप झाला. त्यावर कंपनीने स्पष्टीकरण दिलं.

संतोष कानडे

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुपती देवस्थानामध्ये मिळणाऱ्या लाडूच्या प्रसादावरुन आंध्र प्रदेश आणि देशात वातावरण तापलं आहे. या लाडूसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये जनावरांच्या चरबीचा आणि माशाच्या तेलाचा वापर होत असल्याचा आरोप आहे. तसा एक लॅब रिपोर्टही पुढे आलेला आहे.

तिरुपती मंदिराकडून देण्यात येणाऱ्या प्रसादासाठी अमूलनेही तुपाचा पुरवठा केला, असा आरोप होत होता. 'अमूल'चं नाव पुढे आल्यानंतर आता कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. 'आम्ही कधीच तिरुमला तिरुपती देवस्थानासाठी तुपाचा पुरवठा केला नाही' असं अमूलचं म्हणणं आहे.

अमूलकडून एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, आमचं तूप हे दूधापासून बनवलं जातं आणि आमची उत्पादनं ही काटेकोरपणे तपासली जातात. आम्ही टीटीडीला कधीही तुपाचा पुरवठा केलेला नाही.

सोशल मीडियामध्ये अमूलच्या नावाने काही पोस्ट करण्यात येत आहेत. यामध्ये अमूलकडून तिरुमला देवस्थानला तुपाचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप झाला. त्यावर कंपनीने स्पष्टीकरण दिलं.

अमूलचं स्पष्टीकरण

अमूल तूप हे अत्याधुनिक सुविधांद्वारे दूधापासून बनवलं जातं. ते आयएसओ प्रमाणित आहे. आमचं तूप उच्च प्रतिच्या शुद्ध दूधापासून बनवलं जातं. आमच्या डेअरींमध्ये येणाऱ्या दुधाची एफएसएसआयद्वारे भेसळ तपासणी केली जाते. याशिवाय त्याच्या गुणवत्तेची चाचणी केली जाते.

दरम्यान, तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडून माहिती मागविली आहे. ‘‘आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडून मी विस्तृत अहवाल मागविला असून जे लोक दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’’ असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये प्राण्यांचे मांस मिसळले जात होते, असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीमध्ये बोलताना नायडू यांनी हा आरोप केला आहे. ‘‘वायएसआर काँग्रेसच्या सरकारने व्यंकटेश्‍वर मंदिरालाही सोडले नाही. येथे देण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये प्राण्यांचे मांस वापरले जात होते. हा अत्यंत निंद्य प्रकार आहे,’’ असे नायडू म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT