Titanic
Titanic esakal
देश

Titanic : टायटॅनिकच्या बेपत्ता प्रवाशांचे काय झालं? 111 वर्षांनंतर समोर आलं रहस्य

सकाळ डिजिटल टीम

Titanic : टायटॅनिक जहाजाच्या बेपत्ता प्रवाशांचं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणालाही सापडलेलं नाही. हे रहस्य वर्षानुवर्षे तसंच अनुत्तरीत राहिलंय. आपल्या सर्वांना माहीत आहे की, 14 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर जहाजावरील अर्ध्याअधिक लोकांचा वेदनादायक मृत्यू झाला होता. परंतु बहुतेक मृतांचे मृतदेह सापडले नाहीत. यादरम्यान अनेक मोहिमा राबवण्यात आल्या.

डेलीमेलने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. यासोबतच त्या भीषण आणि वेदनादायक अपघाताची काही छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे अपघाताची भीषण कहाणी सांगतात. अनेक खुणा आजही छायाचित्रांमध्ये दिसतात.

सुमारे 1,160 प्रवाशांचे मृतदेह सापडले नाहीत.

टायटॅनिक जहाजाच्या नव्या डिजिटल स्कॅनमध्ये विध्वंसाची तीव्रता जाणवू शकते. त्या जहाजावर 2,224 लोक होते. असं मानलं जातं की हिमखंडावर आदळल्यानंतर झालेल्या अपघातात 1,517 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार जेम्स डेलगाडो म्हणतात की या जागेजवळ अजूनही 'मानवी अवशेषांचे काही तुकडे' असू शकतात. डेलगाडोच्या म्हणण्यानुसार, 15 एप्रिल रोजी हे जहाज हिमखंडावर आदळल्यानंतर तीन तासांपेक्षा कमी अवधीत बुडाले. समुद्राच्या पृष्ठभागावर लाइफ जॅकेटसह सुमारे 340 मृतदेह दिसले परंतु 1,160 मृतदेह दिसलेच नाहीत.

मागील दोन मोहिमा

यापूर्वी 2000 आणि 2010 मध्ये टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन मोहिमा काढण्यात आल्या होत्या मात्र त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. डेलगाडो सांगतात की, अपघातानंतर जी छायाचित्रे समोर आली आहेत ती खूपच भावूक आहेत. मात्र, या दुर्घटनेला 111 वर्षे झाली तरी अद्याप मानवी अवशेष सापडलेले नाहीत.

हॉलिवूड चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन यांनीही 1997 मध्ये एक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवला होता. टायटॅनिकच्या बुडण्याची कथा चित्रित करणे सोपे नव्हते, परंतु ती हृदय पिळवटून टाकणारी होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे कपडे, शूज, चपलांच्या जोड्या त्यांनी पाहिल्याचं कॅमेरॉनने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं होतं. पण मानवी शरीर पाहिले नाही.

टायटॅनिकचे अवशेष कुठे आहे

टायटॅनिकचे अवशेष अटलांटिकच्या तळाशी सुमारे 13,000 फूट खोलीवर आहे. शंभर वर्षांनंतर इतक्या खोलीवर मानवी शरीराचे अवशेष सापडणे अशक्य आहे. आयर्लंडमधील अटलांटिक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी स्लिगो येथील फॉरेन्सिक सायंटिस्ट प्रोफेसर जॉन कॅसेला म्हणतात की खाऱ्या पाण्यात हाडे लवकर खराब होतात.

मात्र जहाजाच्या ढिगाऱ्यामध्ये मानवी हाडे असू शकतात जी 100 वर्षांनंतरही अडकली असतील असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय टायटॅनिकचे बुडून 73 वर्षे उलटली होती तरी ते सापडलं नव्हतं. शेवटी सप्टेंबर 1985 ला जहाजाचा शोध लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT