SupremeCourt esakal
देश

सुप्रीम कोर्टाचा अपमान करणाऱ्या वेब पोर्टलवर कारवाई करा : साकेत गोखले

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर सुप्रीम कोर्टानं मोठी टीका केली होती.

तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले (Trinamool Congress leader Saket Gokhale) यांनी भारताचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना पत्र लिहिलंय. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा प्रकरणी केलेल्या टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याप्रकणी वेब पोर्टल OpIndia विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी केलीय.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर सुप्रीम कोर्टानं मोठी टीका केली होती. सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्मा (Supreme Court On Nupur Sharma) यांना संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर उदयपूरमधील घटना तिच्यामुळेच घडली असल्याचंही कोर्टानं म्हटलं होतं. उदयपूरमध्ये कन्हैयालाल (Udaipur Kanhaiyalal) नावाच्या एका हिंदूची दोन धर्मांधांनी गळा चिरून निर्घृण हत्या केली. याआधी हत्येच्या वेळी आणि हत्येनंतरही आरोपींनी एक व्हिडिओ तयार केला होता की, “गुस्ताख-ए-रसूलच्या याच शिक्षेमुळे डोकं धडापासून वेगळं झालं, कन्हैयालालला नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याबद्दल शिक्षा झाली”, असं कन्हैयालालची हत्या करणारे आरोपी म्हणाले. आता ही हत्या नुपूर शर्मामुळेच झाल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्यावर नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली होती. नुपूर यांच्या बदली अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, त्यांच्या या वक्तव्यामुळं देशभरातील लोकांच्या भावना भडकल्या आहेत. आज देशात जे काही घडतंय त्याला ती जबाबदार आहे. आम्ही टीव्हीवरील वादविवाद पाहिले असून, नुपूरला भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं कोर्टानं म्हटलं होतं. यावर OpIndia वेब पोर्टलनं ताशेरे ओढले होते आणि कोर्टाचा अपमान केला होता.

यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी भारताचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना पत्र लिहिलं. गोखले यांनी ट्वीट करुन वेब पोर्टलवर अवमानाची कारवाई करण्याची मागणी केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रामाणिकतेबद्दल लोकांच्या मनात केवळ शंकाच निर्माण करत नाहीत, तर देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेलाही बदनाम करण्याचा प्रयत्न वेब पोर्टलकडून होत आहे. OpIndia वेब पोर्टल व्यतिरिक्त संपादकांविरोधातही कारवाई सुरू करण्याची मागणी गोखले यांनी केलीय.

हे पत्र 1 जुलै रोजी OpIndia द्वारे प्रकाशित केलेल्या लेखाचा संदर्भ देतं त्यांनी लिहिलंय की, सर्वोच्च न्यायालय इस्लामवाद्यांसारखं बोलतं, इस्लामिक धर्मांधांकडून हिंदू माणसाच्या शिरच्छेदासाठी नुपूर शर्माला जबाबदार ठरवलं जातंय, ते कितपत योग्य आहे, असं OpIndia च्या लेखांत नमूद केलंय. सामान्य भारतीयांच्या मनात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला अपमानित करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोर्टाला खोटं ठरवणं हा त्यांचा उद्देश आहे. हे पोर्टल सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित खंडपीठानं केलेल्या निरिक्षणांवर आक्षेप घेतात, असं या पत्रात नमूद केलंय. गोखलेंनी OpIndia वेबसाइट आणि संपादकांविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी कारवाई सुरू करण्यासाठी AG कडून या पत्राव्दारे संमती मागितलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT