mamata banerjees criticize PM modi says spent 1500 crore rupees on fuel subsidy  
देश

तृणमूलने शिंजो आबे यांच्या हत्येशी जोडला अग्निपथ योजनेचा संबंध; म्हटलं...

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता - तृणमूल काँग्रेसचे मुखपत्र 'जागो बांगला' ने 'किलिंग ऑफ शिजो इन अग्निपथ छाया' या शीर्षकाच्या बंगाली लेखात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचा संबंध थेट भारतातील संरक्षण भरतीसाठी नव्याने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेशी जोडला आहे. या लेखात असे म्हटले की शिंजो आबेच्या हत्येमुळे भारताच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रतिकार मजबूत होईल, कारण अबे यांना मारणाऱ्या माणसाने विनापेन्शन योजनेअंतर्गत सैन्यात सेवा बजावली होती. (TMC linked shinzo abe murder case with agneepath)

मुखपत्रात म्हटलं की, "केंद्र सरकार देखील अशाच पद्धतीने तरुणांना सैन्यात भरती करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. या योजनेअंतर्गत लोक फक्त 4.5 वर्षांसाठी नोकरीत असतील. निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन किंवा इतर कोणतेही फायदे मिळणार नाहीत. अग्निपथ योजनेवरून तृणमूलने मुखपत्रातून एकप्रकारेे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

शुक्रवारी झालेल्या एका धक्कादायक घटनेत शिंजो आबे यांना 41 वर्षीय तेत्सुया यामागामी याने गोळ्या घालून ठार केले. शिंजो आबे यांच्या निधनानंतर संपूर्ण जगातून शोक व्यक्त करण्यात आला. तर पोलिसांनी 41 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. जपानी माध्यमांनुसार, यामागामीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट त्याने तपासकर्त्यांना सांगितले की तो आबे यांच्या कामामुळे असमाधानी होता. त्यामुळेच त्यांना मारायचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT