TMC mens cut money rate list Rs 200 for last rites Rs 25,000 for house
TMC mens cut money rate list Rs 200 for last rites Rs 25,000 for house  
देश

नेत्यांनी कहरच केला; अंत्यसंस्कारासाठी घेतात कमिशन

वृत्तसंस्था

कोलकताः कमिशन कशामध्ये घ्यावे, याचेही भान नेत्यांना राहिलेले नाही. एखादी व्यक्तीने जगाचा निरोप घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नेत्यांना कमिशन द्यावे लागतात. खरंच, नेत्यांनी कहरच केला आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये अंत्यसंस्कारांसाठीही तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते 200 रूपये कमिशन मागतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे. राज्यात नेते कोणत्या योजनेसाठी किती पैसे उकळतात याचे एक रेटकार्डच समोर आले आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ममोनी सरदार यांनी हुगळी गावात गॅस कनेक्शन दिले जावे म्हणून तृणमूलच्या स्थानिक नेत्याला 550 रूपये दिले होते. कनेक्शनसाठी हे पैसे द्यायला हवेत, असे प्रथम मला वाटले. पण, उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत कोणतेही पैसे न भरताही मला ही जोडणी मिळाली असती, हे नंतर समजले. ममोनी सरदार यांनी पुढे इतर महिलांना सोबत घेऊन या कमिशनविरोधात आवाज उठवला आहे. एवढंच काय अंत्यसंस्कारांसाठीही टीएमसीचे नेते 200 रूपये कमिशन मागतात, प्रत्येक गोष्टीसाठी नेत्यांचे कमिशन ठरलेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सुभाष बिस्वास आणि शिखा मजूमदार या दोन स्थानिक नेत्यांनी उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी मिळावी म्हणून अनेक महिलांकडून 500 ते 600 रूपये प्रत्येकी गोळा केले. आता दोघांचा काहीही पत्ता नाही. तृणमूल काँग्रेस या पक्षाचे स्थानिक नेते सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कट किंवा कमिशन मागतात, असाही आरोप या महिलांनी केला आहे. बीरभूम, हुगळी, मालदा, मुर्शिदाबाद, कूचबिहार आणि दिनजापूर भागातले लोक या कमिशनमुळे त्रस्त झाले आहेत, असाही आरोप ममोनी यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे अन् केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT