Derek O'Brien Suspension Esakal
देश

Derek O'Brien Suspension: TMC खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित, संपूर्ण अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही; कशामुळे झाली कारवाई?

TMC खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर त्यांनी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. त्यांना यापूर्वीही निलंबित करण्यात आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार डेरेक ओब्रायन यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. ओब्रायन यांच्यावर सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले.(Latest Marathi News)

काल (बुधवारी) दुपारी लोकसभेतील सुरक्षेतील गोंधळानंतर आज (गुरुवारी 14 डिसेंबर) संसद पुन्हा एकदा सुरू झाली. यादरम्यान ओब्रायन यांनी राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. (Marathi Tajya Batmya)

डेरेक ओब्रायन यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवर चर्चेची मागणी केली होती. मात्र यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी टीएमसी खासदाराचे नाव घेत त्यांना तातडीने सभागृह सोडण्याचे आदेश दिले.(Latest Marathi News)

धनखड म्हणाले, 'डेरेक ओब्रायनला तात्काळ सभागृह सोडण्यास सांगितले आहे. अध्यक्षांची अवज्ञा करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डेरेक ओब्रायन म्हणतात की, ते नियमांचा आदर करणार नाही. हा अत्यंत गंभीर आहे. ही लज्जास्पद घटना आहे. खासदारांची ही वागणूक चांगली नसल्याचे सभापतींनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT