देश

Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांनी ठोकला मानहानीचा दावा, खासदार दुबे आणि वकील देहदराई यांनी लाचखोरीचे केले होते आरोप

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून तृणमूल काँग्रेसच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचे आरोप लावण्यात आले होते.

Manoj Bhalerao

Mahua Moitra Defamation Case:भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून तृणमूल काँग्रेसच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर महुओ मोईत्रा यांच्याकडून निशिकांत दुबे यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. त्याचबरोबर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे वकील जय अनंत देहदराई आणि अनेक माध्यमांविरुद्ध देखील केस केली आहे.

निशिकांत दुबे आणि जय अनंत यांनी आरोप केला होता की लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात तृणमूल काँग्रेसच्या धडाडीच्या खासदाराने लाच घेतली आहे. महुआ मोईत्रा यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन दत्त यांच्या खंडपीठात लिस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (दि.२० ऑक्टोबर) घेण्यात येणार आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं,ज्यात त्यांनी मोईत्रा यांच्यावर उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. दुबे यांनी सांगितले की देहराई यांनी त्यांना याबाबत पुरावे दिले आहेत. त्यांनी या पत्रात सांगितलं की, अदानी यांच्या विरोधात प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी या उद्योगपतीकडून लाच आणि भेटवस्तु स्विकारल्या आहेत.

दुबे यांनी केलेले आरोप हिरानंदानी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. समुहाकडून सांगण्यात आलंय की, "आम्ही नेहमी व्यापारामध्येच लक्ष केंद्रित केलय. राजकारणात आम्ही व्यापार घुसवत नाही. देशाच्या भल्यासाठी आमच्या समुहाने याआधीही सरकारसोबत काम केलं आहे." (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT