Narendra Modi esakal
देश

Narendra Modi : नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनावर खासदार टाकणार बहिष्कार; 'मोदींनी उद्घाटन करु नये...'

संतोष कानडे

नवी दिल्लीः संसदेच्या नवीन इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे. या इमारीतचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु त्यांच्या हस्ते उद्घानट करु नये, त्यांच्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. आता टीएमसीचे खासदार या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

येत्या २८ तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. मात्र त्यांनी हे उद्घाटन करु नये, अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. राहुल गांधी यांनी काल यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करु नये, त्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, असं म्हटलं आहे. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मात्र पंतप्रधानांनी उद्घाटन करावं, असा आग्रह धरला आहे.

दरम्यान टीएमसी खासदार सौगता राय यांनीही बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यास आमचा विरोध आहे. राष्ट्रपतींनी त्याचे उद्घाटन करावे. आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहोत, पक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेईल, असं राय म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या कामाचा शुभारंभ केला होता. १२०० कोटी रुपये खर्च करुन चार मजल्यांची इमारत उभी राहिली आहे. यामध्ये लोकसभेच्या ८८८ आणि राज्यसभेच्या ३८४ सदस्यांसाठी सदस्यांना बसण्याची व्यवस्था होणार आहे. फक्त २८ महिन्यांमध्ये ही इमारत बनून सज्ज झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT