to save vultures aceclofenac and ketoprofen to be banned in india sakal
देश

Vultures : गिधाडांसाठी घातक ठरणाऱ्या औषधांवर भारतात बंदी; संवर्धनासाठी केंद्र सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल

गुरांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘एसीक्लोफेनाक’ आणि ‘केटोप्रोफेन’ ही औषधे गिधाडांसाठी घातक ठरत आहेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गुरांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘एसीक्लोफेनाक’ आणि ‘केटोप्रोफेन’ ही औषधे गिधाडांसाठी घातक ठरत आहेत. या औषधांचा पशुवैद्यकीय वापर, विक्री आणि उत्पादनावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याबाबत ३१ जुलै २०२३ रोजी अधिसूचना जारी केली आहे. गिधाडांच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत पर्यावरणवाद्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दिल्लीच्या ‘ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाच्या (डीटीएबी) १० मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला होता. या बैठकीत या दोन्ही पशुवैद्यकीय औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. ‘केटोप्रोफेन’ आणि ‘एसीक्लोफेनाक’चा उल्लेख असलेली विविध उत्पादने ही डायक्लोफेनाकसारखीच घातक आहेत. त्यामुळे गिधाडांचा मृत्यू होऊ शकतो. अभ्यासातून हे स्पष्‍ट झाले आहे,’ असे डीटीएबी बैठकीत मांडण्यात आले.

आजारी गुरांना डायक्लोफेनाक, एसीक्लोफेनाक आणि केटोप्रोफेन ही वेदनाशामक औषधे दिली जातात; मात्र आजारी गुराचा मृत्यू झाल्यास त्यांना गावाशेजारी फेकून दिले जाते. गिधाडांनी या गुरांचे मांस खाल्ल्यास या औषधांमुळे ते त्यांच्यासाठी विषारी ठरते. यामुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने या दोन्ही औषधांवर तत्काळ बंदी आणली आहे हे अभिनंदनीय आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर केंद्राने तातडीने अधिसूचना जारी केली. यामुळे गिधाड संरक्षणासाठी मदत होईल. २००६ मध्ये पहिल्यांदा ही मागणी केली होती. तेव्‍हा डायक्लोफेनाकवर बंदी आणण्यात आली होती.

- किशोर रिठे, अंतरिम संचालक आणि मानद सचिव, बीएनएचएस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT