Cigarette Packet Sakal
देश

तंबाखू सिगारेटच्या पाकिटांवर आता नवा इशारा; हेल्पलाईन नंबरही देणार

दोन्ही बाजूला हा इशारा छापलेला असेल.

सकाळ डिजिटल टीम

तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटांवर देण्यात येणारा इशारा आता लवकरच बदलणार आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकिंग संदर्भातल्या कायद्यात नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ डिसेंबरपासून हे बदल होणार आहेत.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर दोन्ही बाजूला धोक्याच्या इशाऱ्याचा नवा फोटो आणि वाक्य वापरलं जाणार आहे. एका बाजूला सध्याचा फोटो आणि इशारा लावण्यात येईल, ज्यामध्ये तंबाखू सेवनाने वेदनादायी मृत्यू होतो, असं लिहिलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला तंबाखू खाणारे तरुण वयातच मृत्यू पावतात, अशा आशयाचं विधान आणि फोटो पाकिटाच्या दुसऱ्या बाजूला लावलेला असेल.

या पाकिटावर व्यसन सोडवण्याची हेल्पलाईनही दिलेली असेल. काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर पांढऱ्या रंगात 1800-11-2356 हा नंबरही दिलेला असेल. सरकार सध्या तंबाखू खाणाऱ्या आणि सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी समुपदेशन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT