Belgaum Black Day esakal
देश

Belgaum Black Day : 'बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे'; सीमाभागात मराठी भाषिकांचा एल्गार

मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात धर्मवीर संभाजी उद्यानापासून फेरी काढण्यास सुरुवात झाली आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी बेळगाव (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) आणि सीमाभागात काळा दिन पाळला जात आहे.

तसेच मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात धर्मवीर संभाजी उद्यानापासून फेरी काढण्यास सुरुवात झाली आहे, तसेच काळे झेंडे आणि काळे फलक घेऊन मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले आहेत. १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना करताना बेळगावसह ८६५ गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली होती. त्याच्या विरोधात दरवर्षी मराठी भाषिक काळा दिन पाळून महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करीत असतात.

Belgaum Black Day

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सीमाभागातील अनेक मराठी भाषिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळला आहे. तसेच संभाजी उद्यान येथून निघणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मात्र, फेरीला परवानगी नसल्याचे कारण देत दरवर्षी मिरवणुकीच्या अग्रभागी असणाऱ्या रिक्षाला मिरवणुकीतून हटविण्यात आले असून फेरीच्या मार्गावर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

परंतु बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त मराठी झालाच पाहिजे आदी घोषणा देत मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शहराच्या विविध भागात फिरून झाल्यानंतर मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT