top tweets 2021 virat kohli narendra modi s tweets got most liked and most retweeted in india Google
देश

Top Tweets 2021: कोहली, मोदींची हवा, मिळाले सर्वाधिक लाईक, रिट्विट

सकाळ डिजिटल टीम

Top Tweets 2021 : ट्विटरने (Twitter) भारतातील 2021 च्या टॉप ट्विटची यादी शेअर केली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटने सरकार, क्रीडा, मनोरंजन इत्यादीसह विविध कॅटिगरीमध्ये सर्वाधिक लाइक केलेले, सर्वाधिक रिट्विट केलेले आणि टॉप ट्विटची यादी जाहीर केली असून यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohali) आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करणारे ट्विट भारतात सर्वाधिक पसंत केलेले ट्विट ठरले आहे. ट्विटला 539.1K लाईक्स आणि 50.4K रिट्विट्स मिळाले आहेत.

2021 चे गोल्डन ट्विट

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सचे भारतातील कोरोना काळात मदतीसाठी देणगी देण्याबद्दलचे ट्विट गोल्डन ट्विट बनले आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॅट कमिन्स यांने भारतातील कोविड रिलीफसाठी देणगी दिली आणि इतरांनीही तसे करावे यासाठी ट्विट केले होते. कमिन्सचे हे ट्विट 2021 मध्ये भारतात सर्वाधिक रिट्विट केलेले ट्विट ठरले. हे वर्षातील सर्वाधिक कोट केलेले ट्विट देखील होते.

मोदींचे ट्विट

त्यानंतर सकरकारकडून केल्या केलेल्या ट्विट्समध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 लसीच्या पहिल्या डोस घत असताना पोस्ट केलेला त्यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता, ज्याला वर्षातील सर्वाधिक रिट्विट मिळालेले ट्विट ठरले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी कोविड-19 विरुद्धच्या लढाईत दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर, वैज्ञानिक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

स्पोर्ट्स

तर भारतीय क्रिकेट संघाने वर्षाची सुरुवातीला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारतीय संघाने गाबा येथे ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केले, ज्याबद्दल पीएम मोदींनी ट्विट करत संघाचे कौतुक केले. हे 2021 या वर्षातील सर्वाधिक लाइक मिळालेले ट्विट बनले आहे.

स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये सर्वाधिक रिट्विट आणि लाईक केले गेलेले ट्विट विराट कोहलीचे होते. आयपीएल दरम्यान, एम.एस. धोनीच्या मॅच विनिंग कामगिरीवर विराट कोहलीने एक ट्विट करत त्याचे कौतुक केले होते. कोहलीने धोनीला बादशाह म्हटले होते. हे ट्विट या वर्षातील क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट झालेले ट्विट होते. 2021 मधील स्पोर्ट्समधले हे सर्वाधिक लाइक्स मिळालेले ट्विट देखील होते.

बिझनेस कॅटेगरी

या वर्षी ऑक्टोबरमध्ये एअर इंडिया 70 वर्षांनंतर टाटा समूहाकडे परत आली. यावर आनंद व्यक्त करताना टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये एअर इंडियाच्या सुरुवातीच्या काळातील एका प्रसिध्द विमानाचा फोटो होता. त्यांनी कॅप्शनमध्ये "वेलकम बॅक, एअर इंडिया" असे लिहिले आहे. रतन टाटा यांचे ट्विट बिझनेस कॅटेगरीत सर्वाधिक रिट्विट केलेले ट्विट ठरले. हे ट्विट या वर्षातील बिझनेसमध्ये सर्वाधिक लाइक केलेले ट्विटही ठरले.

मनोरंजन कॅटेगरीमध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजयने त्याच्या 'बीस्ट' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिव्हील करताना केलेले ट्विट हे भारतातील सर्वाधिक रिट्विट केलेली पोस्ट ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT