देश

देश कोरोना कोटयधीश होण्याच्या उंबरठ्यावर;९५.४० टक्क्यांची कोरोनावर मात 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या आणखी २२,८९० रुग्णांची  (corona patients) नोंद झाली. त्यामुळे, एकूण रुग्णसंख्या ९९ लाख ७९ हजारांवर पोचली आहे. ती लवकरच एक कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. मात्र, यापैकी सुमारे ९५ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. या जागतिक साथीने देशभरात १ लाख ४४ हजार ७८९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

सलग १२ व्या दिवशी कोरोनाची (corona) सक्रिय रुग्णसंख्या ४ लाखांखाली राहिली. सध्या देशात ३, १३, ८३१ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांमध्ये त्यांची टक्केवारी ३.१३ इतकी आहे. तब्बल ९५ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे, देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९५.४० टक्क्यांवर पोचला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताने (India) ७ ऑगस्ट रोजी २० लाख रुग्णांचा तर २३ ऑगस्टला ३० लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर ५ सप्टेंबरला एकूण रुग्ण ४० लाखांवर पोचले. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्या वाढत राहिली. नुकतेच २० नोव्हेंबरला कोरोना रुग्णांनी ९० लाखांचा आकडा ओलांडला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार आत्तापर्यंत देशभरात कोरोनाचे १५ कोटी ८९ लाख १८ हजार ६४६ नमुने घेण्यात आले. त्यापैकी ११ लाख १३ हजार ४०६ नमुने गुरुवारी घेण्यात आले. 

देशभरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात ४८,४९९ रुग्णांची नोंद झाली. मात्र, यापैकी ७० टक्के मृत्यू रक्तदाब, मधुमेहासारख्या इतर आजार असल्यामुळे (कोमॉर्बिडिटी) झाल्याचा आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचे एकूण रूग्ण - ९९, ७९, ४४७ 
बरे झालेले रुग्ण -  ९५, २०,८२७ 
रुग्ण बरे होण्याचा दर - ९५.४० टक्के 

भारतातील कोरोनाचा प्रसार 
तारीख - रुग्णसंख्या 

७ ऑगस्ट -  २० लाख 
२३ ऑगस्ट - ३० लाख 
पाच सप्टेंबर - ४० लाख 
१६ सप्टेंबर - ५० लाख 
२८ सप्टेंबर - ६० लाख 
११ ऑक्टोबर-  ७० लाख 
२९ ऑक्टोबर  - ८० लाख 
२० नोव्हेंबर - ९० लाख 

कोरानाचे बळी 
राज्य  - एकूण मृत्यू 

महाराष्ट्र -  ४८,४९९ 
कर्नाटक  - ११,९८१ 
तमिळनाडू  - ११,९४२ 
दिल्ली  - १०,१८२ 
प.बंगाल -  ८,३१६ 
उत्तर प्रदेश -  ७,०६९ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT