tourists India visit  
देश

Tourism : देशात २०२१मध्ये १५लाखांहून अधिक पर्यटक

भारतामध्ये मागील वर्षी १५ लाख २४ हजार पर्यटक आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतामध्ये मागील वर्षी १५ लाख २४ हजार पर्यटक आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ७४.३९ पर्यटक हे जगातील १० देशांतील असून उर्वरित २५.६१ हे अन्य देशातील असल्याचे गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. कोरोना संबंधीचे निर्बंध असून देखील २०२१मध्ये भारतात आलेल्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन पर्यटक असून त्याखालोखाल बांगला देशातील पर्यटक आहेत.

विशेष म्हणजे मार्च २०२०ते मार्च मार्च २०२२मध्ये आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर देशात निर्बंध लावले होते. ऑक्टोबर २०२०मध्ये देशात जलमार्गे आणि हवार्इमार्गे येणाऱ्या पर्यटकांवरील निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले. ऑक्टोबर २०२१मध्ये टुरिस्ट विसाला परवानगी देण्यात आली.

१५ लाख २४ हजार ४६९

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१मध्ये भारतात आलेले पर्यटक

दहा प्रमुख देशांतील पर्यटक संख्या

  • अमेरिका - ४ लाख २९ हजार ८६०

  • बांगलादेश - २ लाख ४० हजार ५५४

  • ब्रिटन - १ लाख ६४ हजार १४३

  • कॅनडा - ८० हजार ४३७

  • नेपाळ - ५२ हजार ५४४

  • अफगाणिस्तान - ३६ हजार ४५१

  • ऑस्ट्रेलिया - ३३ हजार ८६४

  • जर्मनी - ३३ हजार ७७२

  • पोर्तुगाल - ३२ हजार ०६४

  • फ्रान्स - ३० हजार ३७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT