The Kashmir Files
The Kashmir Files  सकाळ
देश

‘काश्मीर फाईल्स’वरून विषारी प्रचार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे.

या चित्रपटाद्वारे काश्मिरी पंडितांच्या पलायनाबद्दल अपप्रचारातून विषारी वातावरण निर्माण केले जात आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी द्यायला नको होती, अशी तोफ शरद पवार यांनी आज दिल्लीत डागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली प्रदेश शाखेतर्फे अल्पसंख्याक विभागाच्या संमेलनात बोलताना पवार यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली. संसद अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना पवार यांनी सलग दोन दिवसांच्या अंतराने मोदी सरकारविरुद्ध घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षवेधी मानला जात आहे.

भाजपवर टीका

नेहरू यांना वादात खेचल्याबद्दलही शरद पवारांनी भाजपला लक्ष्य केले. काश्मिरी पंडितांचे पलायन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या कार्यकाळात झाले होते आणि त्यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता, तर, भाजपतर्फे निवडणूक लढविलेले जगमोहन हे काश्मीरमध्ये राज्यपाल होते याकडे पवार यांनी लक्ष वेधले. प देशाला वेगळ्या वाटेवर घेऊन जात असून देशातील एकता बंधुभाव नष्ट करत आहे. असा आरोपही पवार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT