Kisan Tractor Rally  esakal
देश

शेतकरी आंदोलन : संसदेवर काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित

केंद्र सरकारला दिला अल्टिमेटम

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संसदेवर २९ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मार्च संयुक्त किसान मोर्चाकडून तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते दर्शन पाल सिंग यांनी शनिवारी ही माहिती दिली. सिंघू बॉर्डवर शेतकऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

ट्रॅक्टर मार्च स्थगित करण्यात आल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी अमृतसर येथे माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आम्ही मांडलेल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी आम्ही सरकारला ४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. यानंतर समिती ४ डिसेंबर रोजी पुढील निर्णय घेईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या विविध संघटनांमध्ये चर्चेनंतर ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संघटनांनी बैठकीदरम्यान आपली मतं मांडली. यावेळी पंतप्रधानांनी आता कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीच आहे, त्यामुळं हा मोर्चा पुढे ढकलण्यात यावा, यावर एकमत झालं.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त किसान मोर्चानं जाहीर केलं होतं की, संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरु होत असल्यानं या दिवसापासून अधिवेशन संपेपर्यंत दररोज ५०० शेतकरी या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होतील, हा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Mumbai Crime: घात की अपघात? विक्रोळीत हत्या झालेले घर जळून खाक, प्रकरणाला नवे वळण

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी सकाळीच केली पोस्ट; जाणून घ्या काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT