देश

Toycathon 2021 : परंपरा-विज्ञान हीच भारताची ताकद - पंतप्रधान

नामदेव कुंभार

विविध क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असतात. विविध क्रीडा प्रकारात जागृकता निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा खेळाडूंना प्रोत्साहितही केलं आहे. आता खेळण्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी सरसावले आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून Toycathon 2021 ला संबोधित केलं. देशभरातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग दर्शवला होता. यावेळी मोदी यांनी जंक फूडचे फायदे आणि नुकसान यावरही सविस्तर चर्चा केली. शाळा हेच मुलांचे पहिले कुटुंब असते. त्याचप्रमाणे खेळ आणि पुस्तक त्यांचे मित्र असतात. तसेच लहानग्यांमधील कुपोषण कसं दूर करता येईल, हेही सांगितलं. ते म्हणाले की, मुलं पौष्टिक खाणं टाळतात. जंक फूड अतिप्रमाणात खातात. त्यामुळेच कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीत खेळातूनचं त्यांना सतर्क केलं जाऊ शकतं. यासाठी योग्य त्या साधनांचा वापर करुन परंपरेप्रमाणे नवीन गेम्स तयार करता येऊ शकतात. परंपरा आणि विज्ञान हीच भारताची खरी ताकद आहे.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका टीमने आपल्या नव्या अॅपच्या बाबतीत माहिती दिली. जे मुलांना निरोगी राहण्यास मदत करते. ही टीम चेन्नई येथील KCG कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी येथील होती. खेळाच्या माध्यमातून योगाचा प्रसार कसा करता येईल, हे या टीमने सांगितलं. यावर मोदी म्हणाले की, परंपरा आणि तंत्रज्ञानाची जोड योग्य पद्धतीने केली आहे. यामुळे योगाचा प्रसार जगभरात करता येईल. कोयंबतूरमधील अतीक नावाच्या मुलाने हेरिटेज रेस नावाची गेम तयार केली आहे. यामध्ये सायकलिंग आणि व्हर्चुअल हेरिटेज साइट सीनला जोडण्यात आलं आहे. या गेमबद्दल ऐकूण पंतप्रधांनी आनंद व्यक्त केला. तसेच कोरोना काळाता व्हर्चुअल गेम्सची आयडिया चांगली असल्याचं म्हणाले. या व्हर्चुअल गेम्सला ट्रेडमील, स्मार्ट वॉचला कसं जोडता येईल, त्यावर काम करण्याचा सल्ला दिला.

60 लाख रुपयांचं बक्षीस -

Toycathon 2021 मार्फत उत्कृष्ट गेम्स तयार करणाऱ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 26 जून रोजी या स्पर्धेचा निकाल लागणार आहे. विजेत्याला 60 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. देशभरातून जवळपास 1.2 लाख जणांनी सहभाग नोंदवला होता.

Toycathon 2021 बद्दल -

टॉयकॅथॉन हे एक खास प्रकारचे हॅकेथॉन आहे जिथे शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी आणि शिक्षक, डिझाइन तज्ज्ञ, खेळणी तज्ज्ञ आणि स्टार्टअप्स, भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य, स्थानिक लोककथा आणि थोर व्यक्ती यावर आधारित खेळणी आणि खेळ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करतील. पाच जानेवारी 2021 रोजी संकेतस्थळ आणि स्पर्धेचं आयोजन केलं होतं. भारताला, जागतिक खेळण्यांचं उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी Toycathon 2021 चं आयोजित केलं जात आहे. शिक्षण मंत्रालय, डब्ल्यूसीडी मंत्रालय, एमएसएमआय मंत्रालय, डीपीआयआयटी, वस्त्रोउद्योग मंत्रालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालय तसेच एआयसीटीय यांच्यामार्फत चालवलं जात आहे. यासाठी नवीन संकेतस्थळही सुरु करण्यात आलं आहे. लहान मुलांच्या खेळण्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरात पोहचवण्याच्या उद्देशाने आणि देशी खेळण्यांना चालना देत हा उद्योग पुढे नेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ही नवी संकल्पना सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT