Doctors  sakal
देश

डॉक्टरांची शपथ बदलणार? 'हिप्पोक्रॅटिक ओथ' ऐवजी भारतीय चरकांची शपथ

सकाळ डिजिटल टीम

वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यात डॉक्टरकीची शपथ दिली जाते. पारंपारिक पद्धतीने देण्यात येणारी ही शपथ हिप्पोक्रॅटिक ओथ म्हणून संबोधली जाते. (Hippocratic Oath)

मात्र आता त्यांची चरक शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय डॉक्टरांनी ग्रीक वैद्याची शपथ घेण्यापेक्षा भारतीय वैद्य असलेल्या चरक यांच्या नावे शपथ घ्यावी, असा प्रस्ताव केंद्रात समोर येणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात चर्चा सुरू आहे.

वैद्यकीय क्षेत्रात हा मोठा बदल येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकतो. डॉक्टरांनी पांढरा कोट परिधान करण्यापूर्वी चरक यांची शपथ घ्यावी, असा विचार सुरू आहे.

सध्या भारतीय डॉक्टर्स ग्रीक परंपरेनुसार शपथ घेतात. यामध्ये बदल होण्याची शक्यता वाढली आहे. व्हाईट कोट सेरेमनीच्या वेळी ही शपथ दिली जाते. नॅशनल मेडिकल काऊन्सिलच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव चर्चेला आला आहे. अधिकृतपणे शपथ बदलण्यात यावी, असी माहिती समोर आली आहे. भारतीय आयुर्वेदाचे जनक असणारे चरक यांच्या नावाने ही शपथ देण्यात यावी. आधुनिक वैद्यकीय शास्त्राचे जनक असणारे हिप्पोक्रॅटिक याचं नाव त्यामुळे पुन्हा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT