traffic Police stays two way transportation on FC Road
traffic Police stays two way transportation on FC Road 
देश

पुणे : एफसी रोडवरील दुहेरी वाहतुक निर्णयास स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक ते वीर चापेकर चौक (कृषी महाविद्यालय) दरम्यान वाहतुक शाखेने सुरू प्रायोगिक तत्वावर दुहेरी वाहतुक सुरू केली. मात्र रस्त्याच्या कामांमुळे होणारी वाहतुक कोंडी आणि दहावी व बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन वाहतुक शाखेने दुहेरी वाहतुकीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे.

ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चापेकर चौक दरम्यानच्या एकेरी वाहतुकीमुळे स्थानिक नागरीकांना फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता किंवा मॉडेल कॉलनी परिसरात येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वळसा घालावा लागत होता. त्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार वाहतुक पोलिसांनी दुहेरी शनिवारपासून दुहेरी वाहतुक सुरू केली होती. मात्र, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ललित महल हॉटेल चौक ते वीर चापेकर चौक दरम्यान उजव्या बाजूला पदपथाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी कमी झाल्याने या भागात वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊ लागला आहे.

सावधान ! आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमच्यासाठी आहे धोका

तसेच सध्या बारावीची परिक्षा सुरू आहे, तर मंगळवारपासून दहावीची परिक्षा सुरू होत आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरामध्ये अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडीचा फटका बसू नये, याचा विचार वाहतुक शाखेकडून करण्यात आला. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वीर चापेकर चौकातून ज्ञानेश्‍वर महाराज पादूका चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध होत नसल्याने दुहेरी वाहतुक तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याचे वाहतुक शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी सांगितले. 

म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला 'या' भागाची पडलीय भुरळ

"दुहेरी वाहतूक सुरू केल्यानंतर या भागात रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहनांना रस्त्यावर पुरेशी जागा मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते. वाहतुकीचे नियोजन करताना काही त्रुटी आढळून आल्या होत्या. वाहतुक कोंडीमुळे वाहनांची रांग फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोखले चौकापर्यंत पोचत होत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात दुहेरी वाहतुक निर्णय स्थगित करण्यात आला आहे.'' - अशोक सायकर, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर वाहतूक शाखा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT