mathura train accident esakal
देश

UP : मथुरेत दिल्ली-आग्रा ट्रॅकवर मालगाडीचे 15 डब्बे रुळावरून घसरले

सकाळ डिजिटल टीम

Train incident in UP : उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) मथुरा जिल्ह्यातील मथुरा-दिल्ली रेल्वे मार्गावर (mathura) सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे (Train incident) 15 डबे रुळावरून घसरले. शुक्रवारी रात्री उशिरा ही ट्रेन दिल्लीहून (delhi) आग्र्याला येत होती. या अपघातामुळे मथुरेच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे (railway) मार्ग वळवण्यात आले आहेत

रेल्वेगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले

मुंबईहून येणाऱ्या राजधानी शताब्दी साप्ताहिक ट्रेन युवा स्पेशलसह महत्त्वाच्या गाड्या दिल्लीला जाण्यासाठी वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. मथुरा रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाश्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रुळावरून डबे हटवण्यासाठी रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

रेल्वे आणि पोलीस प्रशासनाचे स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल

मात्र, धुक्यामुळे त्यांना वाचवण्यात अडचणी येत आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाचे स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी मोठ्या क्रेन मागवून ट्रॅक साफ करण्यास सुरुवात केली. ट्रॅक साफ करण्याचे काम जोरात सुरू आहे.

उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंडर सिमेंट साइडिंग राजस्थानहून गाझियाबादकडे जाणाऱ्या मालगाडीचे १५ डबे मथुरा-पलवल मुख्य रस्त्यावरील वृंदावन-भूतेश्वर येथे उलटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Squad: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! वनडे मालिकेत २ कर्णधार का? शुभमन गिलनंतर श्रेयस अय्यरकडे धुरा; नेमकं कारण काय?

UP Mega Survey: उत्तर प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कुणाला? योगी, अखिलेश की मायावती?

Delhi Protest High Drama : कॅनॉट प्लेसमध्ये 'तिरंगा मार्च'वरून प्रचंड गदारोळ; अभिजीत दिपके, नेहा बोरांसह १५० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी उचलले!

Swargate to Katraj Metro Work : मेट्रोच्या कामासाठी कात्रज चौकात आजपासून वाहतुकीत बदल; जड वाहनांना प्रवेशबंदी

Starlink India Controversy : "माझा मोदींना विरोध आहे, पण बाहेरचा गोरा माणूस भारताचे निर्णय घेऊ शकत नाही!"; इलॉन मस्कवर असदुद्दीन ओवेसी

SCROLL FOR NEXT