Railway Ticket Cancellation Charge Esakal
देश

Railway Ticket Cancellation Charge: वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत

Railway Ticket Cancellation Charge: गिरीडीहचे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील कुमार खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून रेल्वेने हा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. खंडेलवाल यांनी तिकीट रद्द केल्यावर सुविधा शुल्काच्या नावाखाली जादा रक्कम कापली जात असल्याची तक्रार केली होती.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Railway Ticket Cancellation Charge: ज्या प्रवाशांनी काही कारणास्तव आरएसी आणि वेटिंग तिकिटे रद्द केली आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी सुविधा शुल्काच्या नावाखाली मोठी रक्कम आकारणार नाही. मात्र, ही सवलत वेटिंग आणि आरएसी तिकीट रद्द केल्यावरच मिळणार आहे. तर कन्फर्म तिकीट रद्द केल्यावर, रेल्वे पूर्वीप्रमाणेच रद्दीकरण शुल्क आकारत राहील. आरएसी आणि प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. आता अशा तिकिटांवर रेल्वेने निश्चित केलेले प्रति प्रवासी फक्त 60 रुपये रद्दीकरण शुल्क आकारले जाईल.

जादा रक्कम कापली जात असल्याची केली होती तक्रार

वृत्तानुसार, खरेतर, गिरीडीहचे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील कुमार खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून रेल्वेने हा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. खंडेलवाल यांनी तिकीट रद्द केल्यावर सुविधा शुल्काच्या नावाखाली जादा रक्कम कापली जात असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रार पत्रात त्यांनी आयआरसीटीसी प्रवाशांकडून मोठी रक्कम आकारत असल्याचे नमूद केले होते.

खंडेलवाल यांच्या मते, प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करतात. वेबसाईटवरून बुक केलेली प्रतीक्षा तिकिटे(waiting) कन्फर्म होत नाहीत, तेव्हा रेल्वे आपोआप ही तिकिटे रद्द करते. तसेच, ते सेवा शुल्क म्हणून भरलेल्या रकमेतून मोठा भाग कापतात. खंडेलवाल यांनी त्यांच्या तक्रारीत १९० रुपयांच्या वेटिंग तिकिटाचा हवाला दिला होता. ते म्हणाले की, तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वे फक्त ९५ रुपये परत करते आणि ते उरलेली रक्कम वजा करतात.

नियमांनुसार, कन्फर्म तिकीट रद्द केल्यावर, प्रति व्यक्ती 60 रुपये शुल्क कापले जाईल. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या ४८ तास आधी तुमचे तिकीट रद्द करावे लागेल. तर, स्लीपर क्लासचे तिकीट रद्द केल्यावर 120 रुपये शुल्क कापले जाते. तर थर्ड एसी कोचचे तिकीट रद्द केल्यावर 180 रुपये, सेकंड एसी तिकीट रद्द केल्यावर 200 रुपये आणि फर्स्ट एसी तिकीट रद्द केल्यावर 240 रुपये कापले जातात.

परतावा 30 मिनिटे आधीच उपलब्ध

तिकीट कन्फर्म झाल्यानंतर, निर्धारित वेळेच्या ४८ तासांपासून १२ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम कापली जाते. ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी तुम्ही तुमचे तिकीट रद्द केल्यास, तिकिटाची केवळ अर्धी रक्कम परत केली जाईल. तुमचे तिकीट आरएसी आणि वेटिंग लिस्टमध्ये असल्यास आणि ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तुम्ही तिकीट रद्द केले तर तुम्हाला परतावा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

India T20 World Cup Squad Announcement: शुभमन गिलच्या स्थानाला 'या' खेळाडूकडून धोका; SMAT मध्ये १० सामन्यांत चोपल्यात ५१७ धावा, ५१ चौकार अन् ३३ षटकारांचा पाऊस

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

SCROLL FOR NEXT