Pooja Khedkar  esakal
देश

Pooja Khedkar : ''दोष सिद्ध होईपर्यंत मी निर्दोष..'' पूजा खेडकरची पहिली प्रतिक्रिया; आई-वडिलांबद्दलच्या प्रश्नावर दिलं उत्तर

दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रश्नावर पूजाने सांगितलं की, ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, त्यासाठीच एक्स्पर्ट कमिटी स्थापन केली आहे. मी त्यांना उत्तर देईल आणि त्यानंतर ते माझ्याबाबत काय तो निर्णय देतील. हे सगळं ऑफिशिअल कम्युनिकेशन असून गोपनिय आहे. सध्या तरी मी त्यावर काहीही बोलू शकत नाही.

संतोष कानडे

IAS Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरने बोगस अपंग प्रमाणपत्रावरुन नोकरी मिळवण्याचं प्रकरण पुढे येत आहे. तसेच तिने ओबीसी आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचाही संशय आहे. या प्रकरणी एक समिती नियुक्त करण्यात आलेली असून समितीमार्फत पूजा खेडकरची चौकशी होणार आहे.

पूजा खेडकरने सोमवारी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या प्रकरणात समिती गठीत केल्याने मी समितीलाच काय ते उत्तर देईल. आपल्या संविधानामध्ये जोपर्यंत एखाद्याचा दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी म्हणता येत नाही. माझ्या बाबतीत मीडिया ट्रायल सुरु असल्याचंही खेडकरने सांगितलं.

पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार आहेत. याबद्दल तिला विचारलं असता तिने, मला त्याबाबत काहीच आयडिया नसल्याचं म्हटलं. मी त्या विषयावर काही बोलू शकत नाही, सध्या मी प्रोबेशन कालावधीमध्ये आहे आणि माझं शिकणं सुरु आहे.

पूजाने आयएएस होण्यासाठी दोन दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली होती. एक दृष्टीदोषाचं आणि दुसरं मानसिक आजाराचं. परंतु तिने तिसरं प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही प्रयत्न केले होते. मात्र ते तिचं प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्याने नाकारलं होतं.

दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रश्नावर पूजाने सांगितलं की, ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, त्यासाठीच एक्स्पर्ट कमिटी स्थापन केली आहे. मी त्यांना उत्तर देईल आणि त्यानंतर ते माझ्याबाबत काय तो निर्णय देतील. हे सगळं ऑफिशिअल कम्युनिकेशन असून गोपनिय आहे. सध्या तरी मी त्यावर काहीही बोलू शकत नाही.

माझ्याबाबतीत मीडिया ट्रायल सुरु आहे, लोक बघत आहेत.. पण सत्य बाहेर येईल. आपल्या संविधानानुसार आरोप सिद्ध होईपर्यंत तो निर्दोषच असतो. माझा सामान्य लोकांवर आणि मीडियावर विश्वास आहे. त्यामुळे समितीच्या निर्णयानंतर सत्य सगळ्यांसमोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

Mamata Banerjee Exit Poll Reaction : ममता बॅनर्जींचा मोठा दावा! 'एक्झिट पोल्स' पुन्हा एकदा फेल ठरणार; तृणमूल काँग्रेसला मिळणार 226 पेक्षा जास्त जागा

Latest Marathi News Live Update : तरुण कुमार हत्या प्रकरणातील आरोपीच्या घराचा अनधिकृत भाग MCD ने पाडून टाकला

हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या, शिवछत्रपतींच्या तीर्थरुपांची गोष्ट रुपेरी पडद्यावर ! ‘शहाजीराजे’ सिनेमाचं पोस्टर रिलीज

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT