trainee plane Kiran crashed near Bangalore due technical fault haal sakal
देश

Kiran Plane : प्रशिक्षणार्थी ‘किरण’ विमानामध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने बंगळूरजवळ कोसळले

विमानातील वैमानिक प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर सुखरूप उतरले

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : एचएएल येथून प्रशिक्षणासाठी निघालेल्या हवाई दलाच्या ‘किरण’ या विमानामध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते गुरुवारी चामराजनगरनजीकच्या बोगापूर येथे कोसळले. विमान कोसळताच त्याला आग लागली. तेजपाल व भूमिका हे दोघे वैमानिक अपघातातून बचावले.

बंगळूरच्या एचएएल विमानतळावरून अाज दुपारी साडेबाराच्या सुमारास चामराजनगरमार्गे प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेल्या हवाई दलाच्या विमानातील इंजिनामध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला. त्यानंतर विमानाला आग लागली.

विमानातील वैमानिक प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर सुखरूप उतरले. लेफ्टनंट तेजपाल हे वैमानिक भूमिका यांना प्रशिक्षण देत होते. यावेळी इंजिनमध्ये बिघाड होऊन आग भडकली. विमानातील दोघांनी पॅराशूटच्या मदतीने विमानातून बाहेर पडताक्षणी विमानाने जमिनीवर कोसळून पेट घेतला.

विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या तेजपाल व भूमिका यांना कमांडो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारच दिवसांपूर्वी बेळगावनजीक विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोदगा गावाजवळ त्याचे आपत्कालीन लँडिंग झाले होते.

हवाई दलाच्यावतीने प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या विमानातील वैमानिकाने प्रसंगावधान राखत मोदगा गावाजवळील शेतवडीत विमान उतरविले होते. घटनेत वैमानिकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती.

अधिकारी, पोलिसांकडून पाहणी

विमान कोसळल्याचे वृत्त बोगापूर गावात वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एचएएलचे अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT