police  file photo
देश

ट्रान्सजेंडर व्यक्तीला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक; होतेय टीका!

या सर्व घटनेदरम्यान एक फोटो जर्नोलिस्ट देखील पोलिसांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

निनाद कुलकर्णी

आगरतळा : ट्रान्सजेंडर्सना (Transgender )अटक करून त्यांचे लिंग सिद्ध करण्यासाठी पोलीस ठाण्यातच कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर, एका हमीपत्रावर (Undertaking) देखील स्वाक्षरी घेण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. कधीही क्रॉस ड्रेस घालणार नाहीत आणि शहरात कुठेही अशा पोशाखात आढळून आल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते, असे स्वाक्षरी घेण्यात आलेल्या हमीपत्रावर लिहिण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार शनिवारी घडला आहे. याबाबत एनडी टिव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे. (Transgender Harassment By Police )

दरम्यान, शनिवारी रात्री हॉटेलमधील पार्टीतून (Hotel Party) चौघे बाहेर आले तेव्हा ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी चौघांपैकी एकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. हे चैघे जण शनिवारी रात्री एका हॉटेलमधून बाहेर पडले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पश्चिम आगरतळा पोलीस ठाण्यात नेले. तेथे हा सर्व प्रकार घडला. या सर्व घटनेदरम्यान एक फोटो जर्नोलिस्ट देखील पोलिसांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

तक्रारीनुसार, चौघांवर खंडणीचा (Extortion) आरोप ठेवण्यात आला होता आणि त्यांना पश्चिम अगरतळा महिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते, तेथे उपस्थित पुरुष आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना कपडे (Cloths) उतरवण्यास सांगितले. "पोलिस स्टेशनमध्ये, आम्हाला (Police Station) आमचे कपडे काढून आमचे लिंग (Gender) उघड करण्यास सांगितले गेले. सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे पोलिसांनी आमचे विग आणि आतील कपडे पोलीस ठाण्यातच ठेवले," असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

दाखल तक्रारीनुसार, फोटो जर्नॅलिस्टने (Photo Journalist) हॉटेलमधून चौघांचा पाठलाग केला होता आणि त्यांना स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच त्याला आमच्यासोबत हॉटेलमध्ये डान्स (Dance) करायचा होता. मात्र, आम्ही त्याला भाव दिला नाही. त्यामुळे त्याने पोलीस अधिकाऱ्यांसह आमचा पाठलाग केला आणि आम्हाला मेलरमठ परिसरात पकडल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर पश्चिम आगरतळा पोलीस ठाण्यातील कोणत्याही अधिकाऱ्याने यावर भाष्य केलेले नसून, घटनेचा अहवाल मागवण्यात आला असून दोषींना शिक्षा केली जाईल, असे त्रिपुरा पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT