Gujarat Election Result 2022 esakal
देश

Gujarat Election Result 2022: तासाभरात गुजरातचे कल स्पष्ट; 'आप' एवढं पिछाडीवर का?

संतोष कानडे

Gujarat Assembly Election Result 2022: गुजरात निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या तासाभरातच गुजरातचे कल स्पष्ट झालेले आहेत.

गुजरातमध्ये सध्या भाजप १३० पेक्षा अधिकच्या जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४४ जागांवर आघाडीवर आहे. मात्र आम आदमी पक्ष केवळ ४ जागांवर आघाडीवर आहेत. नुकतंच ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी सुरु झालेली आहे. त्यामुळे जागांमध्ये फरक पडू शकतो. मात्र पहिले कल हाती आलेले असून 'आप' मागे पडलेलं आहे.

आम आदमी पक्षाने यावेळी गुजरामध्ये ताकद लावली होती. दिल्ली आणि पंजाबमधील त्यांचे मंत्री गुजरातमध्ये ठाण मांडून होते. पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी गुजरातचे अनेक दौरेही केले. मात्र म्हणावं तस यश सध्या दिसून येत नाहीये.

गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली.

मध्य गुजरातमध्ये ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT