MP crime news 
देश

क्रौर्याची परिसीमा; वाहनाला बांधून फरफटत नेल्यानं आदिवासी तरुणाचा मृत्यू

मध्य प्रदेशातील प्रकार; किरकोळ अपघातानं पेटला वाद

सकाळ वृत्तसेवा

नीमच (मध्यप्रदेश) : मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यात क्रौर्याची परिसीमा गाठली. दोन दिवसांपूर्वी सिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कला येथे किरकोळ अपघातामुळे एका जमावाने आदिवासी युवकाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला वाहनाला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याला दवाखान्यात नेले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखला झाला असून आरोपी फरार आहेत.

कान्हा ऊर्फ कन्हैयालाल भी (वय ३५) असे मृत आदिवासी युवकाचे नाव आहे. बाणदा या आपल्या गावातून तो एका साथीदारासह नीमच सिंगोली मार्गावरून कला येथे जात होता. यादरम्यान एका व्यक्तीची दुचाकी त्याला धडकली. या अपघाताने वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने नातेवाइकांना बोलावले आणि त्यांनी एकत्र येऊन आदिवासी युवकाला बेदम मारहाण केली. त्याला एका टेम्पोला बांधले आणि फरफटत नेले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेले असता दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

यासंदर्भात नीमचे पोलीस अधीक्षक सूरजकुमार वर्मा म्हणाले, "गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास आरोपी छीतरमल गुर्जर याच्या मोटारसायकलने कान्हाला धडक दिली. यादरम्यान छीतरमल याच्या गाडीला असलेली दुधाची कॅन खाली पडली. यावेळी कान्हाने दगड उचलला. यामुळे छीतरमलने नातेवाइकांना बोलावले आणि कान्हाला बेदम मारहाण केली. यावेळी एक पिकअप गाडी जात होती. आरोपींनी कान्हाचे हातपाय बांधले आणि त्याला शंभर मीटरपर्यंत ओढत नेले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला"

अमानुष घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस घटनास्थळी पोचले. परंतू तोपर्यंत आरोपी फरार झाले. पाचही आरोपींची ओळख पटली आहे. या घटनेत मोटारसायकल, दोन चारचाकी वाहने आणि पिकअप व्हॅन आणि नायलॉन दोरी पोलिसांनी जप्त केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Snake in Grapes Farm : शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला! द्राक्ष वेलीवर वेटोळे घालून बसलेल्या नागाला पाहून काळजाचं पाणी झालं; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

SCROLL FOR NEXT