देश

तृणमूल काँग्रेसचे असाल तरच रोजगार मिळणार; सरपंचाने काढला आदेश

शंभर दिवसांसाठी रोजगार योजनेअंतर्गत केवळ तृणमूल काँग्रेसशी जवळीक असलेल्या नागरिकांनाच रोजगार मिळेल, असा आदेश दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका सरपंचाने काढला आहे.

वृत्तसंस्था

कोलकता - शंभर दिवसांसाठी रोजगार योजनेअंतर्गत केवळ तृणमूल काँग्रेसशी (Trinamool Congress) जवळीक असलेल्या नागरिकांनाच रोजगार (Employment) मिळेल, असा आदेश दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका सरपंचाने (Sarpanch) काढला आहे. त्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण तप्त झाले. राजकीय कल हा अशा बाबतीत निकष असू नये असे इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षाने म्हटले आहे. (Trinamool Congress Employment West Bengal Sarpanch Order Dispute)

भांगर तालुक्यातील भोगाली-दोन पंचायतीचे सरपंच मोदस्सर हुसेन यांनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्यावेळी आयएसएफसाठी काम केलेल्यांना आता रोजगार हवा असेल तर त्यांनी सत्ताधारी पक्षाला शरण जावे. तेव्हा आमच्याकडून सर्व सुविधा घेऊन इतर पक्षांसाठी काम केलेल्यांचा त्याशिवाय विचार केला जाणार नाही.

भांगर येथे तृणमूल काँग्रेसला आयएसएफकडून पराभव पत्करावा लागला. अब्बास सिद्दीकी यांच्या पक्षाला मिळालेली ही एकमेव जागा ठरली. विजयी आमदार नौशाद सिद्दीकी यांनी सांगितले की, निर्वाचित प्रतिनिधी राजकीय भूमिका काहीही असली तरी सर्वांसाठी कार्य करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT