Mukul Roy sakal
देश

TMC Mukul Roy : मुकुल यांचे भाजप प्रवेशाचे सूतोवाच

मुलांकडून इन्कार; ‘तृणमूल’शी एकनिष्ठ असल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे सूतोवाच केले असून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. मात्र आज सकाळी त्यांचा मुलगा शुभ्रांगशू यांनी त्यांचे म्हणणे फारसे मनावर घेऊ नका, असे आवाहन करत त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याचे नमूद केले. माझ्या वडिलांचा वापर केला जात असून त्यांनी थोडी जनाची बाळगावी, असे ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी मुकुल रॉय बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा शुभ्रांगशू यांनी केली होती. त्यानंतर ते दिल्लीत असल्याचे उघड झाले आणि वैयक्तिक कामासाठी राजधानीत गेल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी एका बंगाली वृत्तवाहिनीशी बोलताना मुकुल रॉय म्हणाले, आपण तृणमूलचा राजीनामा अगोदरच दिला आहे. भाजपचे आमदार आहोत आणि भाजपसमवेत राहू इच्छितो. दिल्लीत माझी राहण्याची व्यवस्था पक्षाकडून करण्यात आली.

मला गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्षांशी बोलण्याची इच्छा आहे. बऱ्याच काळापासून आपली प्रकृती बरी नाही. त्यामुळे राजकारणापासूनही दूर राहिलो आहे. परंतु आता माझी तब्येत चांगली असून राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहे. आपण शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगतो की, आपण कधीही तृणमूल कॉंग्रेसमवेत जावू इच्छित नाही. त्यांनी मुलालाही सल्ला देत शुभ्रांगसू देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतो आणि हा पक्ष त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरेल.

सुवेंदू अधिकारी यांचे टीकास्त्र

तृणमूल कॉंग्रेसच्या बाबतीत मत मांडण्यास भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी नकार दिला. विरोधी पक्ष नेते अधिकारी यांनी मुकुल रॉय यांच्या वापसीचा इन्कार करत अशा लोकांना पक्षात घेण्याबाबत आम्ही उत्सुक नाहीत, असे सांगितले. आम्ही बूथ पातळीवर संघटना मजबूत करत आहोत, असे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT