Trinamool MP Saugat Roy Sakal
देश

५० लाख रुपये कुठून आले?

केकेचा कार्यक्रम : तृणमूल खासदाराचा पक्षालाच प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता - प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ केके यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद उफाळून आला. आता तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला त्यांच्याच खासदाराने जाब विचारला आहे. या कार्यक्रमासाठी ५० लाख रुपये कुठून आणण्यात आले, असा सवाल तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेला केला आहे.

नझरूल मंच असे या संघटनेचे नाव आहे. ३१ मे रोजी या कार्यक्रमासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आल्याबद्दल त्यांनी टीका केली. या रकमेचे स्रोत काय होते, असा प्रश्न त्यांनी केला. याशिवाय तरुण नेत्यांच्या नितीमुल्यांबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विशेष म्हणजे तृणमूल छात्र परिषदेच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावरूनच त्यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले की, या कार्यक्रमासाठी ३० ते ५० लाख रुपये खर्च आल्याचे मी ऐकले. इतका पैसा आला कुठून ? पैसे हवेतून तर येत नाहीत. तेवढी रक्कम उभी करण्यासाठी तुम्हाला प्रायोजक किंवा गुड यांच्यासमोर शरणागती पत्करावीच लागते. या वयात तुम्ही असे शरण जाणार असाल तर मग भविष्यात कसे लढणार?

हा कार्यक्रम अखिल भारतीय तृणमूल छात्र परिषदेच्या (टीएमसीपी) सर गुरुदास महाविद्यालय युनियनने आयोजित केला होता. केके यांच्या मृत्यूनंतर कार्यक्रमाशी संबंध असल्याचा टीएमसीपीने इन्कार केला होता. ही रक्कम महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दिल्याचा दावाही करण्यात आला होता.

भाजपकडून टोला

सौगत रॉय यांचे वक्तव्य प्रसिद्ध होताच भाजपकडून टोला लगावण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार म्हणाले की, ‘बंगालमध्ये हे तर उघड गुपित आहे. हे सारे कसे चालते हे प्रत्येकाला ठाऊक आहे. रॉय हे वरिष्ठ नेते तसेच प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्यांनी किमान सत्य तरी कबूल केले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Raigad Flood Tribute: जांभूळपाडा महापुराला ३७ वर्षे; अंबा नदी प्रलयातील ८० जणांना स्मृतिस्तंभाजवळ अश्रुपूर्ण श्रद्धांजली

LPG Gas: 15 ऑगस्टपासून 10 किलोचा सिलिंडर मिळणार; सरकारी तेल कंपनीचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Mumbai Rain: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पूरस्थितीमुळे २ जणांचा मृत्यू, तर २४४ जणांची सुटका; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT