Congress vs BJP
Congress vs BJP sakal
देश

Tripura Assembly Elections : त्रिपुरा साठी भाजप-कॉंग्रेसच्या पहिल्या याद्या जाहीर

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आगामी १६ फेब्रुवारीला मतदान होणाऱया त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आणि कॉंग्रेसने आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या आज जाहीर केल्या. एकूण ६० जागांपैकी भाजपने ४८ तर कॉंग्रेसने १७ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांना तर कॉंग्रेसने सुदीप राय बर्मन यांना उउमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांचे तिकीट भाजपने कापले आहे.

मुख्यमंत्री साहा त्यांच्या बोरदोवली शहरातूनच निवडणूक लढवणार आहेत. गेल्या वेळी याच जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते विधानसभेत पोहोचले होते.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २१ जानेवारीला जारी करण्यात आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जानेवारी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी आहे. ६० जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीच्या निकालांसह त्रिपुराचेही निकाल २ मार्चला जाहीरहोतील.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक काल (शुक्रवारी) पक्षाच्या मुख्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत त्रिपुरासाठीची पहिली यादी निश्चित करण्यात आली.

दरम्यान आज यादी जाहीर झाल्यावर डॉ. साहा यांनी ट्विट करून सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. भाजपच्या यादीत स्वप्ना मुझुमदार (राजनगर सीट), रणजीत दास (अमरपूर), गौतम सरकार (बेलोनिया), दीपयन चौधरी (हरिश्मुख), शंकर राय (सब्रूम), रतन लाल नाथ (मोहनपूर), कृष्णधन दास (बामूटिया), रतन चक्रवर्ती. (खैरपूर) आणि दिलीपकुमार दास (बरजाला)आदी प्रमुख उमेदवार आहेत.

कॉंग्रेसचे १७ उमेदवार जाहीर

काँग्रेसने ज्या १७ उमेदवारांना तिकीट दिले आहे. त्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुदीप रॉय बर्मन, प्रशांत सेन चौधरी, सिस्ता मोहन दास, आशिष कुमारा साहा, गोपाल राय, केशव सरकार, राज कुमार सरकार, सुसांता चक्रवर्ती, अशोक देवबरमा, डॉ. सत्यबन दास, बिराजित सिन्हा आणि छयन भट्टाचार्जी आदी प्रमुख नावे आहेत.

भाजपच्या प्रचाराची मदार पंतप्रधान नरेंद्रमोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. काँग्रेसनेही आपल्या ४० सदस्यीय स्टार प्रचारकांची यादी यापूर्वीच जाहीर केली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी, राज्य प्रभारी अजय कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, सचिन पायलट, मोहम्मद अझरुद्दीन, अरविंदर सिंग लवली, दीपा दास मुन्शी, विजेंदरसिंह, बी व्ही श्रीनिवास, नेट्टा डिसोझा आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.

पाच वर्षांपर्यंत डाव्यांची एकहाती सत्ता असलेल्या त्रिपुरात निवडणूक हिंसाचाराचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. राज्यातील३३२८ मतदान केंद्रांपैकी तब्बल ११०० केंद्रे 'असुरक्षित' म्हणून जाहीर करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनीच सांगितले. याशिवाय असे २८ बूथ अतीसंवेदनशील (क्रिटिकल) म्हणून ओळखले गेले आहेत जेथे गेल्या निवडणुकीत उमेदवाराला ७० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT