Truck Driver was arrested for allegedly offering namaz 
देश

रस्त्याच्या कडेला ट्रक लावून नमाज पठण...ट्रॅफिक जाम? चालकाला अटक

Truck Driver was arrested for allegedly offering namaz: गुजरातच्या बनासकांठा येथे एका ड्रायव्हरने रस्त्यावर गर्दी असताना कोणतीही परवानगी न घेता नमाज पढली आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

गांधीनगर- गुजरातमध्ये रस्त्याच्या कडेला आपला ट्रक उभा करुन नमाज पढणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी सांगितलं की, गुजरातच्या बनासकांठा येथे एका ड्रायव्हरने रस्त्यावर गर्दी असताना कोणतीही परवानगी न घेता नमाज पढली आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. (truck driver was arrested for allegedly offering namaz prayers on the side of a busy road)

रस्त्यावर गर्दी असताना, वाहने येतजात असताना व्यक्तीने आपली ट्रक बाजुला लावली. त्यानंतर तो आपल्या ट्रक समोर नमाज पढू लागला. या प्रकाराचा एकाने व्हिडिओ काढला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका होऊ लागली होती. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय बचल खान याला अटक करण्यात आली आहे. बचल खान याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम २८३, १८६ आणि १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली आहे.

पालनपूर एरोमा सर्कलवर बचल खान याने रस्त्याच्या कडेला नमाज पठण केले. मीडिया रिपोर्टनुसार, यामुळे काहीवेळ ट्रॅफिक जाम झाली होती. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की एक व्यक्ती ट्रकच्या समोर नवाज पढत आहे. व्हिडिओची पुष्टी 'सकाळ' करत नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरुन लोकांनी अशा कृतीला विरोध करत बचन खान याच्यावर टीका केली आहे. नमाज पठण रस्त्यावर केल्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. हे चुकीचं आहे, असं एकाने म्हटलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test, 3rd Day: केएल राहुलचं शतक, तर कर्णधार गिल ९८ वर बाद! भारताची न्यूझीलंडवर भलीमोठी आघाडी

'माहेरची साडी'च्या सिक्वेलमध्ये कुणी करावी अलका कुबल यांची भूमिका? अजिंक्य देव यांनी घेतलं या टीव्ही अभिनेत्रीचं नाव, सगळ्यांची आहे लाडकी

Maharashtra: ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; प्रशासकीय यंत्रणेवर वॉच, मंत्र्यांना उपस्थिती बंधनकारक

Petrol-Diesel Price: पेट्रोलवर 3 रुपये, तर डिझेलवर तब्बल 25 रुपयांचा तोटा! 21 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर; 1 लिटर कितीला?

Latest Marathi News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील चार वाहनांची एकमेकांना धडक; ओतूर दौऱ्यादरम्यान अपघात

SCROLL FOR NEXT