rahul gandhi news esakal
देश

Video : राहुल गांधींचं सामान न्यायला ट्रक आला, गाडीत काय-काय भरलंय बघा

संतोष कानडे

नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना शासकीय निवासस्थान सोडण्यास सांगण्यात आलेलं होतं. आज राहुल गांधी यांच्या घरातील सामान नेण्यासाठी ट्रक आला. यावरुन राहुल गांधी घर रिकामं करताय, हे निश्चित झालेलं आहे.

'मोदी' आडनावावरुन केलेल्या टिपण्णीनंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणी. या निर्णयावरुन लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं.

हेही वाचाः Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर देशाच्या राजकारणात गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. काँग्रेसकडून या प्रकरणी कोर्टात दाद मागण्यात आलेली आहे. मात्र त्यापूर्वी राहुल गांधी यांना शासकीय निवासस्थान खाली करण्यास सांगण्यात आलेले होते.

लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने २२ एप्रिलपर्यंत राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता राहुल यांचं सामान ट्रकमधून नेण्यात येत आहे.

'एएनआय'ने यासंदर्भातील एक ट्विट केलेलं असून एका ट्रकमध्ये राहुल यांचं सामान भरलेलं दिसत आहे. राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई हेतूपुरस्सर असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Deal : जगासाठी दिलासा! अमेरिका-इराण तणाव १०७ दिवसांनी संपला, 'होर्मुझ' पुन्हा खुली होणार, ट्रम्प यांची शांती कराराची घोषणा

थेट भेट : ‘भारताची ग्रोथ-स्टोरी अजूनही मजबूत’

T20 World Cup मध्ये हरमनप्रीत कौर बनली भारताची अव्वल फलंदाज, पाकिस्तानविरुद्ध खेळताना मोडला मिताली राजचा विक्रम

अर्थभान : पैशांचे सोंग आणता येत नाही...

करकायदा : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी

SCROLL FOR NEXT