Truth cannot be hidden Rahul Gandhi Jignesh Mevani pm Modi new delhi esakal
देश

सत्य गजाआड करता येणार नाही, राहुल गांधींचा मोदींना इशारा

काँग्रेस समर्थक आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी केलेल्या अटकेवरून काँग्रेसने ‘हुकूमशहा घाबरला’अशी खवचट प्रतिक्रिया व्यक्त केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस समर्थक आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी केलेल्या अटकेवरून काँग्रेसने ‘हुकूमशहा घाबरला’अशी खवचट प्रतिक्रिया व्यक्त केली. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले असून ‘सत्य गजाआड करता येणार नाही’, असा इशारा दिला. मेवानी यांनी मोदींच्या विरोधात केलेल्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे आसाममधील कोक्राझार जिल्ह्यातील पोलिसांनी आज पहाटे मेवानी यांना गुजरातमधून अटक केली.

यामुळे संतप्त झालेल्या राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करणारे ट्विट केले. मोदीजी, तुम्ही सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधाचा आवाज दपडण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु तुम्ही कधीही सत्याला तुरुंगात डांबू शकत नाही, असा हल्ला ट्विटद्वारे चढवला. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना हुकूमशहा घाबरला, अशी खिल्ली उडवली. पोलिसांनी मध्यरात्री गुजरातच्या पालनपूर येथून आमदार जिग्नेश मेवानी यांना अटक करणे, हेच घाबरल्याचे चिन्ह आहे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT