Turkey Earthquake 2023 
देश

Turkey Earthquake : आम्ही निघताना ते धायमोकलून रडत होते; जवानांनी सांगितला PM मोदींना तुर्कीतील अनुभव

काही दिवसांपूर्वी बसलेल्या भीषण भुकंपाच्या धक्क्यांनी तुर्की आणि सीरिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Turkey Earthquake : काही दिवसांपूर्वी बसलेल्या भीषण भुकंपाच्या धक्क्यांनी तुर्की आणि सीरिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

आतापर्तंय या घचनेत जवळपास ५0 हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, हाजारो लोक जखमी झाले आहेत. तुर्कीतील भीषण भुकंपानंतर भारताने सर्वात प्रथम तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला होता.

तुर्कीतील नागरिकांच्या मदतीसाठी भारताकडून NDRF च्या तुकड्या पाठवण्यात आल्या होत्या. या सर्व तुकड्या आता पुन्हा भारतात परतल्या आहेत.

यानंतर पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन दोस्त'मध्ये सहभागी जवानांशी संवाद साधला. जवानांनी सांगितलेले सर्व अनुभव ऐकून सर्व भारतीयांची छाती गर्वाने फुलून येईल.

आम्ही परतताना अनेकजण रडत होते

यावेळी जवानांनी सांगितले की, आम्ही ज्यावेळी सर्व कार्य करून मायदेशी परतत होतो त्यावेळी तुर्कीतील अनेक नागरिक रडत होते. तर काहींनी आमच्या कपाळावर चुंबन घेतले. तर अनेकजण सांगत होते की, तुर्कीतील भावी पिढी भारताचे हे योगदान कायम स्मरणात ठेवेल.

एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, मी या देशाचा तरुण आहे आणि तुमच्या देशाने आमच्या देशासाठी जे केले ते येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील याची मी खात्री देतो.

बचाव दलातील एका एनडीआरएफच्या महिला जवानाने सांगितले की, एक महिला म्हणाली की, अल्लाह माझ्यासाठी प्रथम स्थानावर आहे तर, तुमच्या मदतीनंतर तुम्ही दुसऱ्यास्थानी आहात.

दरम्यान, ऑपरेशन दोस्त भारताचे मानवतेसाठीचे समर्पण आणि संकटात सापडलेल्या देशांना मदत करण्यासाठी त्वरित उभे राहण्याची वचनबद्धता दर्शवते असे मत मोदींनी कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT