'Sending Love From India' Sakal
देश

'Sending Love From India' : तुर्कीला ब्लँकेट पाठवलेल्या भारतीयाची चिठ्ठी वाचून दूतावास भावूक

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामध्ये अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

तुर्की आणि सिरियामध्ये मोठा भूकंप झाला आहे. तर आत्तापर्यंत या अपघातामध्ये २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे जीव गेले आहेत. जगभरातून तुर्कीसाठी मदतीचे हात पुढे येत असून अनेकांनी बचाव कार्यासाठी जवान पाठवले आहेत. तर भारतातून एका नागरिकाने तुर्कीमधील निराधार लोकांसाठी १०० ब्लँकेट पाठवले आहेत.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

कुलदीप, अमरदीप, सुखदेव आणि गौरव असं नाव असणाऱ्या चार जणांनी मिळून तुर्कीतील नागरिकांसाठी १०० ब्लँकेट पाठवून दिले आहेत. तर त्याच्यासोबत एक चिठ्ठी पाठवली आहे. त्यामध्ये एक संदेश लिहिला आहे.

"भारताकडून प्रेम पाठवत आहोत... दोन दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपात अनेक जणांचा जीव गेला त्याचबरोबर मोठं नुकसानही झालं. तुमच्या दु:खात आम्ही सर्व भारतीय सहभागी आहोत. या संकटाविरूद्ध लढण्याचे सामर्थ्य देवो हीच देवाकडे प्रार्थना" असा मजकूर या चिठ्ठीत लिहिला आहे.

दरम्यान, तुर्की राजदूत फिरात सुनेल यांनी ही चिठ्ठी आपल्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर केली असून सध्या या चिठ्ठीची जोरदार चर्चा आहे. तर भारताकडूनही तुर्कीसाठी मोठी मदत देण्यात आली आहे. अनेक देशांकडूनही मोठी मदत तुर्कीसाठी मिळत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT