Tushar Gandhi Said Rahul gandhi Reassuring Voice In Politics Should Not Apologize Savarkar row  
देश

Savarkar row : राहुल गांधींच्या वक्तव्यावर महात्मा गांधींच्या पणतूचे मोठं विधान, म्हणाले...

गांधींचे पणतू तुषार म्हणाले, राजकारणात राहुल यांच्या रूपाने आश्वासक आवाज

सकाळ डिजिटल टीम

राजकारणात राहुल यांच्या रूपाने आश्वासक आवाज, त्‍यांनी माफी मागू नये. अशी भूमिका महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मांडली आहे. राहुल यांनी कोर्टात माफी मागितली नाही. मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे म्हटल्याने देशासह राज्यभरात घमसान माजले आहे. (Tushar Gandhi Said Rahul gandhi Reassuring Voice In Politics Should Not Apologize Savarkar row )

दरम्यान, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रत्यक्षपणे दाखवून दिले.

काय म्हणाले तुषार गांधी?

राहुल गांधी यांनी कोर्टात माफी मागितली नाही. मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे म्हटले. माफी मागून संसदेत राहणे चांगले राहिले नसते का? असा सवाल उपस्थित केला असता.

जर त्यांनी माफी मागितली असती तर जे बोलले ते सत्य नाही, हे सिद्ध झाले असते. राहुल यांच्या वक्तव्यात कोणत्या जातीचा अपमान किंवा त्यावर हल्ला करण्याचा उद्देश नव्हता.

मला नाही वाटत ते जे काही बोलले यात कुणाविषयी घृणा होती.भाजप या वक्तव्याला जातीय रंग देऊ पाहतेय. ज्यांच्याविषयी बोलले त्यांनी काय केले, हे संपूर्ण जगाला माहीत आहे.

जर राहुल गांधी मोठ्या कोर्टात दोषी ठरले तरी त्यांनी माफी मागावी, असे मला वाटत नाही. हे एक ऐतिहासिक तथ्य आहे की, सावरकरांनी माफी मागून स्वत:ची सुटका केली होती.

राहुल गांधींविषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यामुळेच मी भारत जोडो यात्रेत गेलो होतो. गेल्या ४ ते ८ वर्षांबाबत बोलायचे झाले तर, केवळ एकच आश्वासक आवाज राजकारणात उठत असून तो राहुल गांधींचा आहे. त्यांनी स्वत:ला बदलले आहे.

त्यांनी वेगळ्याप्रकारचे नेतृत्व करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. परंतु काँग्रेस नेतृत्वाला स्वत:ला सुधारावे लागेल. अशी खंतही तुषार गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : IIT मुंबईच्या गेटबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT