A tweet was caused by her release from Dubai
A tweet was caused by her release from Dubai 
देश

एका ट्विटमुळे झाली "तिची' दुबईतून मुक्तता ! 

पीटीआय

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचे महाराष्ट्र सदनातील भाषण दूरचित्रवाणीवरून पाहणारी पंजाबमधील एक महिला कार्यकर्ती त्यांना दुबईत फसवून नेलेल्या सिमरन नावाच्या एका पीडित तरुणीबाबत ट्विट करते....त्यानंतर दुबईतील भारतीय दूतावासामार्फत तातडीने हालचाली होतात आणि अक्षरशः 24 तासांत या दलालाच्या तावडीतून सिमरनची मुक्तता केली जाते........कालच (ता. 29) घडलेल्या या घटनेची माहिती स्वराज यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना लगेच दूरध्वनीवरून दिली....सध्या सर्वत्र आरडाओरड होणाऱ्या सोशल मीडिया किंवा नव माध्यमांचा सकारात्मक पैलू उलगडणारे हे ताजे उदाहरण. 

राज्य महिला आयोगाने मानवी तस्करीसंबंधी शनिवारी घेतलेल्या परिषदेचे उद्‌घाटन करताना स्वराज यांनी या धंद्यातील दलालांना वेसण घाला, असे राज्य सरकारांना आवाहन केले होते. "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केलेल्या फरीदा नावाच्या अंबरनाथमदील युवतीचेही उदाहरण त्यांनी दिले. मुंबईत भर समुद्रकिनाऱ्यावरील इमारतींमध्येही अशाच दलालांनी अनेक मुलांना ठेवल्याचे सांगून त्यांनी राज्याच्या गृहखात्याचीही लक्तरे वेशीवर टांगली होती. स्वराज यांचे हे भाषण मोनिका शर्मा यांनी पंजाबमध्ये ऐकले व आपल्या मैत्रिणीची बहीण सिमरनची झालेली फसवूक सांगणारे ट्विट स्वराज यांना केले.

दुबई विमानतळावर एकाकी असलेल्या सिमरनला फसविणाऱ्या इब्राहिम युसूफ नावाच्या एजंटचीही माहिती तिने त्यांना छायाचित्रासह कळविली. तिची तातडीने सुटका करा; अन्यथा हा एजंट तिच्याशी बरेवाईट करू शकतो, अशी भीती तिने व्यक्त केली होती. सदनातील कार्यक्रम संपवून जाताना स्वराज यांनी ते पाहिले व गाडीतूनच त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हलविले. स्वतः मंत्र्यांच्याच आदेशानंतर तातडीने दुबईतील भारतीय वकिलातीला दूरध्वनी गेले व भारतीय यंत्रणांनी पुढच्या 24 तासांत तातडीने हालचाली करून सिमरनची या दलालाच्या तावडीतून मुक्तता केली. 

महिला-तरुणांना विदेशांत फसवून नेण्याचा धंदा पंजाबमध्ये सर्वाधिक फोफावला आहे. किंबहुना हे राज्य या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. साहजिकच स्वराज यांच्या या ट्टिट संवादाची दखल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही घेतली व स्वराज यांना त्यांच्या प्रयत्नांबाबत धन्यवाद दिले. स्वराज यांनी त्यांना, पंजाबातील अशा दलालांची नावे केंद्राने तुम्हाला कळविली आहेत; आता त्यांना वेसण घालण्याची वेळ तुमची आहे असे सांगताच सिंग यांनी तातडीने कारवाई करू, असा शब्द "सुषमादीदींना' दिला. 
 

पोलिस अधिकाऱ्यांनाही गौरविणार 

मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महिलांना फसवून विदेशात नेणाऱ्या अशा दलालांची माहिती त्या-त्या जिल्ह्यांमधील पोलिसांकडे असतेच. जे पोलिस आयुक्त आपापल्या जिल्ह्यातील दलालांना पकडून कारवाई करतील त्यांना केंद्र सरकार दिल्लीत दरवर्षी होणाऱ्या प्रवासी भारतीय परिषदेमध्ये खास सन्मानित करेल, असेही स्वराज यांनी रहाटकर यांना सांगितले. "विजया, ये तुम्हारे प्रयासों के कारन हुआ !' अशी पावतीही स्वराज यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT