Rameshwaram Cafe esakal
देश

Rameshwaram Cafe : रामेश्वरम कॅफेचं प्रकरण ताजं असताना कर्नाटक-आंध्रप्रदेश सीमेवर बाराशे जिलेटिनच्या कांड्या अन् डिटोनेटर जप्त

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : बंगळूरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी कोलार जिल्ह्यातील कर्नाटक-आंध्रप्रदेश सीमेवरील चेकपोस्टवर खासगी मोटारमधून स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. १२०० जिलेटिनच्या कांड्या, डिटोनेटर वायरचे सात बॉक्स आणि सहा डिटोनेटर्सचा समावेश आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा संशयित फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोलार जिल्ह्यातील मूळबागल तालुक्यातील नांगली चेकपोस्टवर ही कारवाई केली. खासगी वाहनामधून स्फोटकांची वाहतूक केली जात होती. आम्ही एका आरोपीला अटक केली आहे, तर त्याच्या फरार साथीदाराला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेकायदेशीर उत्खननासाठी वाहतूक केली जात होती की नाही, हे शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

बॉम्बस्फोटाशी संबंधाचा तपास

दोन्ही व्यक्तींचा कॅफेच्या बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याबद्दल चौकशी केली जात आहे. रामेश्वरम कॅफेमध्ये एक मार्च रोजी झालेला बॉम्बस्फोट इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) वापरून करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी-एनआयए) कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास करत आहे. संस्थेने मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन ताहा यांची याप्रकरणी प्रमुख संशयित म्हणून ओळख पटविली आहे. एजन्सीने आरोपींची माहिती देण्यासाठी १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुझम्मील शरीफ या संशयिताला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

SCROLL FOR NEXT