देश

भारताचा चुकीचा नकाशा; ट्विटर इंडियाच्या प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल

सूरज यादव

ट्विटरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी युपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली - ट्विटरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी युपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांचेही नाव आहे. बंजरंग दलाच्यावतीने याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. महिन्याभरात उत्तर प्रदेशात मनीष माहेश्वरी यांच्या विरोधातील ही दुसरी तक्रार आहे. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा हटवला आहे. याआधी ट्विटरकडून जम्मू काश्मीर आणि लडाखला वेगवेगळे देश असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ट्विटरच्या ट्विप लाईफ सेक्शनमध्ये ही चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात होता. तसंच ट्विटरविरोधात कारवाईची मागणीसुद्धा केली गेली.

ट्विटरने पुन्हा एकदा खोडसाळपणा करत काश्‍मीर आणि लडाखचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करून नव्या वादाला तोंड फोडले होते. या मुद्यावरून संतप्त भारतीय युजरकडून कारवाईची जोरदार मागणी झाल्यानंतर ट्विटरने चुकीचा नकाशा हटवित सपशेल माघार घेतली.

देशाचा चुकीचा नकाशा दाखविणे हा गंभीर गुन्हा असल्याने सरकारने ट्विटरवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ट्विटरने याआधी देखील अशी खोड काढत भारताच्या नकाशामध्ये हेराफेरी केली होती. आज दुहेरी कुरापत काढताना ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भाग भारताच्या नकाशाबाहेर दाखविले होते तसेच निवासी तक्रार निवारण अधिकारीपदी परकी अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. ट्विटरच्या ट्विट लाइफ विभागातील नकाशात हेतुपुरस्सर फेरफार करण्यात आल्याचे एका युजरने निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT