Twitter Sakal
देश

देशाचा कायदाच सर्वोच्च, कंपनीचे धोरण नव्हे; केंद्राने ट्विटरला ठणकावले

सूरज यादव

नवी दिल्ली - आपण आपल्या कंपनीच्या धोरणाला बांधिल आहोत असे सांगणाऱ्या ट्विटर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेला संसदीय समितीने आज जोरदार आक्षेप घेतला. तसेच, देशाचा कायदा हाच सर्वोच्च असल्याचे त्यांना ठणकावले. एवढेच नाही तर, कायद्याचा भंग केल्याबद्दल तुम्हाला दंड का करू नये, याचे कारण देण्यासही समितीने ‘ट्विटर’च्या अधिकाऱ्यांना सांगितले.

माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतूदींवरुन केंद्र सरकार आणि ट्विटर कंपनीमध्ये वाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर आज ट्विटर इंडियाच्या सार्वजनिक धोरण विभागाचे व्यवस्थापक शगुफ्ता कामरान आणि विधी सल्लागार आयुषी कपूर यांनी आज संसदीय समितीसमोर हजेरी लावली. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे तातडीने पालन करण्यासाठी अखेरची संधी देताना केंद्र सरकारने ट्विटर कंपनीच्या भारतातील अधिकाऱ्यांना संसदीय समितीसमोर हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती.

समितीच्या सदस्यांनी आज या ट्विटर कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्‍न विचारले. मात्र, हे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, असे सूत्रांनी सांगितले. देशाच्या कायद्यापेक्षा कंपनीचे धोरण अधिक महत्त्वाचे असल्याच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यावर समितीने तीव्र आक्षेप घेतला आणि ‘तुमचे धोरण नव्हे, देशाचा कायदाच सर्वोच्च आहे,’ असे ठणकावून सांगितले.

कंपनीने नव्या कायद्याचा अवलंब न केल्यास त्यांना कायद्याअंतर्गत मिळणारी सूट रद्द केली जाईल, असा इशारा केंद्र सरकारने त्यांना दिला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखाली माहिती आणि तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीने गेल्या आठवड्यात ट्विटरने त्यांच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आणून देत नोटीस बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT