देश

ट्विटरकडून चुकीची दुरुस्ती; व्यंकय्या नायडूंच्या ट्विटरवर पुन्हा 'ब्लू टीक'

विनायक होगाडे

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाउंट काही तासांसाठी अनव्हेरिफाइड केलं होतं. उपराष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवण्यात आली होती. उपराष्ट्रपतींच्या ट्विटरची ब्लू टिक हटवल्याचं निदर्शनास आल्यानंतर अनेकांनी राग व्यक्त केला होता. सरकारनेही याबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती. फक्त व्यंकय्या नायडू नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत अनेकांच्या ट्विटर हँडल समोरचे ब्लू टीक हटवण्यात आले होते. मात्र आता हे ब्लू टीक पुन्हा देण्यात आलं आहे.

ट्विटर इंडिया आणि भारत सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासूनच वाद सुरु आहे. सरकारने लागू केलेल्या नव्या आयटी नियमांवरुन हा सगळा वाद सुरु होता. त्या पार्श्वभूमीवरच घडलेल्या घटनेमुळे आणखीनच वाद ताणला जाण्याची शक्यता आहे. मात्र, ट्विटरने आता सारवासारव करुन आपली चूक पुन्हा दुरुस्त केली आहे.

ट्विटरमधील सुत्रांनी याबाबत म्हटलंय की, व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाउंट गेल्या वर्षीच्या जुलैपासून सक्रिय नसल्याकारणाने त्यांचं ब्लू टीक निघालं होतं. व्यंकय्या नायडूंचं ट्विटर हँडल @MVenkaiahNaidu ला 1.3 दशलक्ष फोलोवर्स आहेत. या अकाउंटवरुन शेवटचं ट्विट 23 जुलै 2020 ला करण्यात आलं आहे.

ट्विटरच्या अटी आणि नियमांनुसार जर कोणी हँडलचं नाव बदललं तर ब्लू टिक हटवली जाते. तसंच एखादं अकाउंट सक्रिय नसेल, अपडेट नसेल्यास अनव्हेरिफाइड केलं जातं. तसंच ज्या कारणासाठी अकाउंट व्हेरिफाय केलं होतं ते राहिलं नसेल तर अकाउंट अनव्हेरिफाइड करण्यात येतं. समजा एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण करत नसल्यास ब्लू टिक हटवली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT