श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) अचानक झालेल्या ग्रेनेडच्या (Grenade Blast) स्फोटात भारतीय लष्करातील (Indian Army) दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लष्करातील कॅप्टन आणि एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे. तर, या दुर्घटनेत अन्य पाच जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मेंढर सेक्टरमध्ये ही घटना घडली तेव्हा लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमी कॅप्टन आणि जेसीओ यांना उपचारासाठी उधमपूरला नेण्यात आले, मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Jammu Kashmir Grenade Blast News In Marathi )
कॅप्टन आनंद (Captain Anand) आणि नायब-सुभेदार (जेसीओ) भगवान सिंह (Bhagwan Singh) असे ग्रेनेडच्या अपघातात मृत्यू झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांची नावे आहे. तर इतर पाच जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकांऱ्यांनी दिली आहे. रविवारी रात्री उशिरा पुंछमधील मेंढार सेक्टरमध्ये (Medhar Sector) ही घटना घडली. घटनेवेळी लष्कराचे जवान ड्युटीवर होते. घटनेनंतर जखमींना तातडीने उधमपूरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
याआधी रविवारी दुपारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक सहायक उपनिरीक्षक (ASI) शहीद झाले तर, अन्य एक प्रवासी जखमी झाला होता. घटनेनंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. शहीद एएसआय विनोद कुमार हे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील रहिवासी होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.