Two Arrested in Uttarakhand For Chatting About Killing Defence Minister Nirmala Sitharaman in Dehradun
Two Arrested in Uttarakhand For Chatting About Killing Defence Minister Nirmala Sitharaman in Dehradun 
देश

संरक्षणमंत्र्यांच्या हत्येचा कट ? ; दोघांना अटक

वृत्तसंस्था

देहरादून : देशाचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्याबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. निर्मला सीतारामन पिथौरागड जिल्ह्यातील एका वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनासाठी येणार होत्या. त्यापूर्वीच या दोघांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली. 

''व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपमध्ये संरक्षणमंत्र्यांच्या हत्येबाबत चॅटिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅटिंग करण्यात आले होते. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटकही केली असून, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटकेतील दोघे हत्यारे बाळगत होते का ? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? या बाजूने चौकशी सुरु केली जात आहे. याचबरोबर संबंधित ग्रुपच्या अॅडमिनलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे'', अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, याप्रकरणी सध्या चौकशी सुरू करण्यात आली असून, दोघांनीही दारूच्या नशेत असे चॅटिंग केल्याचे प्राथमिकरित्या अंदाज व्यक्त होत आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सागितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT