suicide
suicide 
देश

काश्‍मीरमध्ये ‘सीआरपीएफ’च्या दोन अधिकाऱ्यांची आत्महत्या 

जावेद मात्झी -सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

पहिली घटना ही घटना दक्षिण काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात घडली. कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्याच्या भीतीने ‘सीआरपीएफ’ पोलिस उपनिक्षक फतेह सिंग यांनी आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ते जैसलमेरमधील ४९ व्या बटालियनमधील होते. कामावरुन युनिटमध्ये परत आल्यानंतर त्याने सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळ्या झाडल्या. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फतेह सिंग यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असल्याचे नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसऱ्या घटनेत करननगर येथे ‘सीआरपीएफ’ सहाय्यक उपनिरीक्षक बंगाली बाबू (वय ४७) यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यांना रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT