Two commit suicide in Rajasthan love affair Two commit suicide in Rajasthan love affair
देश

जावई आणि सासू पडले एकमेकांच्या प्रेमात; घरातून पळाले अन्...

सकाळ डिजिटल टीम

बाडमेर : जावई आपल्या सासूच्या प्रेमात पडला. सासूही जावयावर प्रेम करू (love affair) लागली. यानंतर दोघांनीही झाडाला गळफास लावून आत्महत्या (commit suicide) केली. होताराम भील (२५, रा. केरवा) आणि डारिया (रा. खार्तिया) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यात सोमवारी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. (Two commit suicide in Rajasthan love affair)

मृत होतारामचा विवाह एक वर्षापूर्वी खरटीया येथील नेमाराम यांची मुलगी गीता (२०) हिच्याशी झाला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी होताराम पत्नी गीतासोबत सासरच्या घरी आला होता. दरम्यान, होताराम व त्याची सासू डारिया सोमवारी कोणालाही न सांगता घरातून पळून गेले. गावापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बारमेर मुनाबाव रस्त्यावरील खेजरीच्या झाडाला त्यांनी गळफास लावून आत्महत्या (commit suicide) केली, असे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह उतरवले. मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासात प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणाची (love affair) बाब समोर येत असली तरी या प्रकरणाची सविस्तर माहिती तपासानंतरच समोर येईल, असे ग्रामीण पोलिस अधिकारी पर्वत सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT