molestation 
देश

भाजप कार्यालयात 2 तरुणींशी छेडछाड झाल्याचा आरोप; काँग्रेसचा हल्लाबोल

सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात छेडछाड झाल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. एका मुलीने व्हिडिओ जारी करत म्हटलंय की, राजधानी भोपाळमध्ये असलेल्या भाजप कार्यालयात एका वयस्कर व्यक्तीने छेडछाड केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदेशातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला. असे असले तरी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. तरुणीने सांगितलंय की, आपले राजकीय ज्ञान वाढवण्यासाठी ती भाजपच्या कार्यालयात असलेल्या नानाजी देशमुख लायब्रेरीमध्ये जायची. 12 मार्चला कार्यालयातील लायब्रेरीमध्ये एक वयस्कर त्यांच्या जवळ येऊन बसला आणि त्यांची छेड काढू लागला. 

तरुणीने सांगितलं की, 'व्यक्तीने तिच्या एका मैत्रीणीचीही छेड काढण्याचा प्रयत्न केला. तो म्हणायचा, तुझ्याकडे मोटारसायकल आहे, तर मला घरी सोडत जा.  त्यानंतर तरुणीच्या मैत्रीनेने त्रासाला कंटाळून व्यक्तीला व्हॉट्सऍप आणि इतर ठिकाणी ब्लॉक केलं.' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस प्रवक्ता सैय्यद जाफर यांनी मुख्यमंत्री शिवराज यांच्यावर निशाणा साधला. चारित्र्याच्या बढाया मारणारे मामाजी पाहा, तुमच्या भाचीसोबत काय होत आहे? ती नानाजी यांच्या संस्काराचे अनुकरण करण्यासाठी गेली होती, पण भाजपच्या कार्यालयात तिच्यासोबत हे काय होत आहे?, असं ते म्हणाले. दुसरीकडे भाजपने म्हटलंय की, व्हिडिओचा तपास करुन सत्य काय आहे हे पाहिलं जातंय.

प्रदेश काँग्रेस मीडिया समन्वयक नरेंद्र सलूजा म्हणाले की, 'भाजप कार्यालयाशी जोडल्या गेलेल्या या प्रकरणाला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने व्हायला हवा, अशी आमची मागणी आहे. पोलिसांनी तत्काळ दोन्ही तरुणींचे जबाब घेऊन दोषींविरोधात कारवाई करायला हवी. त्यांनी म्हटलं की, भाजप नेतृत्वाने याप्रकरणी स्पष्टीकरण द्यायला हवं.' 'लाईव्ह हिंदूस्तान'ने यासंबंधी वृत्त दिलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT